नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
गोवा/प्रतिनिधी- भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्र.11 कार्यालयाला 25 जानेवारी रोजी मुरगाव येथील कॅप्टन ऑफ पोर्टसकडून आयएफबी सी क्वीन (IND-KA-01-MM3032) हे जहाज संकटात असल्याचा निरोप मिळाला. तसेच जहाजावरील एका सदस्याला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती.
गोवा तटरक्षक मुख्यालयाने तातडीने कार्यवाही करत आयएफबी सी क्वीनला मदत केली. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या अपूर्वा जहाजाने वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली. जहाज रत्नागिरीवरुन कारवारच्या दिशेने जात होते. प्रथमोपचार करुन जहाजावरील तिघाजणांची सुखरूप किनारी आणले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सागरी सुरक्षा पोलिसांकडे सुपूर्द केले. मुरगाव बंदर प्राधिकरणाने जहाज 26 जानेवारी रोजी दुरुस्त केले.