पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी वंजारी महिला शाखेतर्फे पारंपारिक गीतांचा कार्यक्रम

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, महिला शाखे तर्फे वंजारी भवन कल्याण येथे संक्रांत हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.सदर कार्यक्रमात अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या महिला शाखा अध्यक्षा सौ लता पालवे व कार्याध्यक्षा सौ वंदना सानप यांनी नष्ट होत चाललेले पारंपरिक मौखिक साहित्य जतन करण्यासाठी आगळी वेगळी संकल्पना राबवली ज्या मध्ये
समाजामध्ये आजही खेड्यामध्ये लग्नाच्या वेळी प्रत्येक विधीला वेगवेगळी पारंपारिक गाणी म्हटली जातात परंतु ही गाणी आत्ताच्या नवीन पिढीला पाठ नाहीतच पण माहिती देखील नाही, त्यामुळे हे पारंपारिक शब्दधन जुन्या पिढी सोबत नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे ते जतन व्हावे हे वाण जुन्या पिढीकडून नवीन पिढीकडे दिले जावे म्हणून जुन्या पिढीतील महिलांचा या मौखिक पद्धतीने चालत आलेल्या पारंपरिक लग्न गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात सौ हौसाबाई घुगे ,अनुसया आव्हाड, कलावतीबाई घुगे, बेबीताई दराडे अंजनाबाई घुगे मीराबाई घुगे, गंगुबाई घुगे, वत्सलाबाई घुगे या जुन्या पिढीच्या माहिलांनी ही पारंपरिक गीते सादर केली . या सर्व सत्तरीच्या आसपासच्या महिलाना पहिल्यांदा व्यासपीठावर बोलावून कुणीतरी त्यांनी जपलेलं हे शब्दधन आत्मसात करण्याचा ,जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे याचा आनंद वाटत होता, तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.सदर महिलांनी या गीतां सोबतच जुनी पारंपरिक मोठ मोठी उखाणी घेऊन उपस्थितांची दाद मिळवली.

या आगळ्या वेगळ्या कार्यकमासाठी महिलांनी मोठया प्रमाणात गर्दी करून आनंद घेतला ,हे मौखिक धन शब्दांकित करण्याची इच्छा यावेळी अनेक महिलांनी व्यक्त केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. यशोदा आव्हाड व कु. गौरी सानप यांनी केले. तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष सौ.वंदना सानप ,सचिव सौ यशोदा आव्हाड, खजिनदार जयश्री दौंड तसेच कार्यकारी सभासद सौ. मनीषा घुगे, प्रेरणा काकड, सविता घुगे ,अश्विनी डोमाडे यांनी विशेष परिश्रम घेतले

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web