महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत वंचितला जाहीर पाठिंबा

नेशन न्यूज मराठी टीम.

अहमदनगर/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष मा.एन.एम.पवळे,पी.पी.खंडागळे,यांनी सहकारी मित्र तसेच नाशिक,अहमदनगर,जळगाव, धुळे,नंदुरबार येथील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि महासंघाशी संलग्न असलेले कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांच्यावतीने वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अधिकृत उमेदवार मा.रतन बनसोडे यांना जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी एन.एम.पवळे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांच्याशी चर्चा करून निवडणुकीत पाठिंब्यासह विखुरलेल्या मतदार पर्यंत पोहचावे लागेल. त्यांना वंचित बहुजन आघाडी उमेदवाराची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट सांगावी लागेल याबाबत रणनीती आखावी लागेल यावर चर्चा केली. रतनजी बनसोडे,सेवानिवृत्त उपायुक्त,सामाजिक न्याय विभाग हे नाशिक पदवीधर मतदार संघाकडून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. कोकण विभाग आणि नाशिक विभागात त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या समाजातील अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक न्याय विभागात कार्यरत असताना अनेक गरजूंना मदत केली आहे.निवडणुकीच्या आखाड्यात उतरून आपल्या फुले शाहू आंबेडकरी समाजातील पदवीधर मतदारांना साद घातली आहे.आयू रतन बनसोडे साहेब यांना मतदान करण्याची साद घातली आहे.

आपल्यातील अनेकजण नाशिक पदवीधर मतदार संघात मतदार असतील,आपला मित्रपरिवार,आपले आप्तेष्ट,नातेवाईक त्या मतदारसंघातील मतदार असतील.नाशिक पदवीधर मतदारसंघात नाशिक,अहमदनगर,धुळे,जळगाव,नंदुरबार ह्या जिल्ह्यातील मतदार आहेत.आपला एक स्नेही मोठी हिंमत दाखवून पहिल्यांदाच ही निवडणूक लढवीत आहेत.‌कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी महासंघाशी संलग्न असलेले यांना आपण नाशिक मतदार संघात कोणत्याही जिल्ह्यात पदावर कार्यरत असाल तिथे आपण रतन बनसोडे यांना जास्तीत जास्त मदत करावी असे माझे वैयक्तिक मत आहे. काही आपल्यापैकी नाशिक विभागाव्यतिरीक्त जिल्ह्यात सेवेत रहिवासी असाल,सेवेत असाल कदाचित सेवानिवृत्तीनंतर इतरत्र रहिवासी असाल तरी आपल्या फुले शाहू आंबेडकरी बांधवासाठी तनमनाने मदतीचा हात द्यावा.राजकीय पक्ष कोणताही असला तरी आपल्या प्रत्येक बौध्द बांधवाने ज्या जिद्दीने ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे त्या जिद्दीने आपणही होईल तेवढी मदत करून निवडून आणण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन करण्यात आले.यावेळी युवा आघाडी राज्य उपाध्यक्ष चेतन गांगुर्डे,उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात,अहमदनगर जिल्हा निरीक्षक सुरेश शेळके,जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा सचिव चंद्रकांत नेटके,कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे,नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे,शहर जिल्हा सचिव भाऊ साळवे,उपाध्यक्ष प्रवीण ओरे,बबलू भिंगारदिवे,गणेश राऊत,सागर ढगे आदीसह नाशिक पदवीधर निवडणूक मतदार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web