प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – 2023 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कामगिरी बजावणा-या एकूण 901 पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली. यामध्‍ये 140 जणांना  शौर्य पोलीस पदक (पीएमजी) देवून गौरविण्‍यात येणार आहे, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) 93 जणांना देण्‍यात येईल तर 668 गुणवंतांना  पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

140 शौर्य पुरस्कारांपैकी बहुतांश, म्हणजे  80, डाव्या अतिरेकी विचारसरणीच्या  प्रभावित क्षेत्रात कार्यरत  जवानांना जाहीर झाले आहेत; तर  जम्मू आणि काश्मीर भागातील 45 जवानांची त्यांनी दाखवलेल्या  शौर्यासाठी निवड केली गेली आहे.  शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्‍ये   सीआरपीएफचे ४८ जवान , महाराष्ट्रातील३१ , जम्मू-कश्मीर पोलिसांपैकी २५, झारखंडचे०९, दिल्ली, छत्तीसगड आणि बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलाचे  प्रत्येकी ०७ आणि उर्वरित इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफचे जवान आहेत.

शौर्य पोलीस पदक (पीएमजी) हे जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तसेच  गुन्हेगारी रोखताना, गुन्हेगारांना अटक करताना दाखवलेल्या  विशिष्ट शौर्याच्या आधारावर प्रदान केले जाते. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) देण्‍यासाठी निवड करताना  पोलीस सेवेतील विशेष कार्यामध्‍ये असलेल्या सहभागाच्या  नोंदीवरून दिले जाते आणि गुणवत्तेसाठी असलेले पोलीस पदक (पीएम) संसाधन आणि कर्तव्य, सेवेतील  निष्ठा यांचा विचार करून अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते.

यंदाच्या  पोलिस पदक विजेत्यांची सूची खाली देण्‍यात आली आहे.

अनुक्रमविषय  संख्‍या 
1शौर्य पोलीस पदक (पीएमजी)140
2विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम)93
3गुणवंत पोलीस पदक 668
4राज्यनिहाय / दलनिहाय पदक विजेते पोलिस कर्मचारीसूचीप्रमाणे

परिशिष्‍ट -1 साठी येथे क्लिक करावे.

परिशिष्‍ट -2 साठी येथे क्लिक करावे.

परिशिष्‍ट -3 साठी येथे क्लिक करावे.

परिशिष्‍ट -4 साठी येथे क्लिक करावे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web