बनावट बांधकाम परवानगी प्रकरणातील बांधकामावर केडीएमसीचा हातोडा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत.त्यामुळे नागरीकरनही झपाट्याने वाढताना दिसत आहे.मुंबई व आसपासच्या उपनगरातील नागरिक कल्याण डोंबिवली मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होताना दिसत आहे. परवडणाऱ्या घरांमुळे कल्याण डोंबिवलीत नागरिकांचा कल जास्त आहे. त्यामुळे नामांकित विकासक ही कल्याण डोंबिवली वळले आहेत . या कारणामुळे नव नवीन टोलेजंग इमारती येथे निर्माण होताना दिसत आहेत.

त्यातच अनधिकृत बांधकामे करणाऱ्या विकासकांनीही आपला मोर्च्या येथे वळवल्याचा आपल्याला दिसून आला आहे. त्यामुळेच आता अनधिकृत बांधकामा विरोधात कल्याण डोंबिवली महापालिकेने कंबर कसलेली दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार, उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ६/फ प्रभागाचे सहा. आयुक्त भरत पाटील यांनी बोगस बांधकाम परवानगी प्रकरणातील विकासक रविराज पाटील यांची डोंबिवली पूर्व खंबाळपाडा, भोईरवाडी रस्ता, शंखेश्वर पार्कच्या बाजूला असलेल्या आर.सी.सी. तळ + १ इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली आहे

सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक जयवंत चौधरी व इतर कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, टिळकनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि १पोकलेन,१ जेसीबी, 2 गॅस कटर, ४ ब्रेकर व यांच्या सहाय्याने करण्यात आली.

बनावट कागदपत्रानुसार सदर इमारत सागर गोपीनाथ भोईर व इतर (जमिन मालक) कु.मु.म्हणून मे.सनशाईन डेव्हलपर्स तर्फे भागीदार रविराज भगवान पाटील (विकासक) व्दारा वास्तुशिल्पकार मे.वासतु रचना डोंबिवली पूर्व यांनी बांधलेली होती.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web