राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

नेशन न्यूज मराठी टीम.

दावोस/प्रतिनिधी – स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये  सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

मंत्री सामंत म्हणाले, आज दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी दावोस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्त्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी सांगितली.

यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य कारारा बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

१.      Greenko energy Projects Pvt.Ltd १२००० कोटींची गुंतवणूक

२.      Berkshire Hathaway Home Services Orenda India १६००० कोटींची गुंतवणूक

३.      ICP Investments/ Indus Capital १६००० कोटींची गुंतवणूक

४.      Rukhi foods २५० कोटींची गुंतवणूक

५.      Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. १६५० कोटींची गुंतवणूक

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web