मुंबई येथे व्हेटरन्स डे परेडमध्ये ५०० हून अधिक माजी सैनिकांनी नोंदवला सहभाग

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – नेव्ही फाउंडेशन मुंबई चॅप्टर (NFMC) च्या नेतृत्वाखाली आणि पश्चिम नौदल  कमांडच्या सहकार्याने, मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे आज 8 जानेवारी 2023 रोजी वार्षिक व्हेटरन्स डे परेड आयोजित करण्यात आली होती. या संचलनाचे नेतृत्व नेव्ही फाउंडेशन मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष आणि 85 वर्षांहून अधिक वयाच्या तीन ज्येष्ठ सैनिकांनी केले.

या तुकडीमध्ये शौर्य पुरस्कार विजेते तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा  समावेश होता. या दिग्गजांनी अभिमानाने पलटणींमध्ये संचलन केले. सेवा काळात कष्टाने मिळवलेली पदके या ज्येष्ठ सैनिकांनी गर्वाने आपल्या छातीवर मिरवली. राष्ट्रीय छात्र सेना आणि एससीसी कॅडेट्सही संचलनात  सहभागी झाले होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोश्यारी यांनी या परेडला हिरवा झेंडा दाखवला. व्हाइस ॲडमिरल ए बी सिंग (एफओसी-इन-सी डब्ल्यूएनसी) ; लेफ्टनंट जनरल एच एस कहलो  (जीओसी एमजी अँड जी एरिया); रिअर एडमिरल ए एन प्रमोद (एफओएमए) आणि एव्हीएम रजत मोहन (एओसी एचक्यूएमएओ) हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

देशासाठी लढाई लढलेले 500 हून अधिक ज्येष्ठ सैनिक आणि वीर नारी मोठ्या आवेशाने आणि देशभक्तीच्या भावनेने सहभागी झालेल्या या संचलनाने मुंबईतील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web