कल्याण डोंबिवली महापालिका पत्रकार संघा तर्फे पत्रकार दिन साजरा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पत्रकार हा सर्व प्रथम नागरीक आहे. पत्रकारिता करताना त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे तसेच पत्रकाराने बातमी लिहिल्या नंतर ती प्रशासनाने टोचून घेऊ नये. बातमी करत असताना पत्रकारानेही प्रशासनाची बाजू तपासून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका पत्रकार संघ तर्फे आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात केले.
कल्याण डोंबिवली महापालिका पत्रकार संघ तर्फे पालिकेच्या पत्रकार कक्षेत दर्पणकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन करून जागतिक पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शहर अभियंता अर्जुन आहिरे, सहाय्यक नगररचनाकार दीक्षा सावंत, पालिका सचिव तथा जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतांना अर्जुन अहिरे यांनी’ आपल्या भाषणात सांगितले कि, पत्रकार हा सर्व प्रथम नागरीक आहे. पत्रकारिता करताना त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे असा मोलाचा सल्ला देखील पत्रकरांना दिला. पत्रकार म्हणून समाजासाठी नागरिकांसाठी ज्या काही सूचना प्रशासनला तुम्ही द्याल, त्या सूचना तुम्ही व आम्ही मिळुन सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. पत्रकार कक्ष अद्ययावत असावे तसेच पत्रकारांना पत्रकार कक्षात बसल्यावर सकारात्मक ऊर्जा मिळावी व आनंदी वातावरण असावे या करिता कक्षात सोयी सुविधा नक्कीच पुरवून पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करू असे आश्वासन पत्रकारांना या वेळी दिले.

तर पालिका प्रशासन आणि पत्रकार यांचे एक नाते आहे. जनसंपर्क विभागाचे प्रमुख असल्याने पत्रकारिता जवळून पाहायला मिळाली. पत्रकारांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या बातमीतील कलागुण पाहायला मिळाले. तसेच समस्या जाणवल्या. प्रशासनाची चांगली प्रतिमा जनतेपर्यंत पत्रकारांच्या माध्यमातून पोहोचवू शकत आहे. अधिकाऱ्यांना पत्रकारांना माहिती देण्याची भीती वाटत होती. मात्र त्यांच्यातील संपर्क वाढल्याने ती भीती कमी झाली असून आवश्यक असलेल्या बातमीसाठी माहिती अधिकारी वर्ग देऊ लागले आहेत असे जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव यांनी कार्यक्रमावेळी आपले मत व्यक्त केले.

समाजातील चांगल्या वाईट गोष्टी पत्रकारितेच्या माध्यमातून लवकर माहित पडतात. त्याचा प्रभाव सर्वांवर पडत असतो. पत्रकारितेत असलेल्या ताकतीचा उपयोग करून कल्याण डोंबिवलीला प्रशासनाला पुढे नेऊ असे सांगत कल्याण डोंबिवली महापालिका नगररचनाकार दीक्षा सावंत यांनी पत्रकरांना चांगले, निरोगी आरोग्य लाभो अश्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश तांबे, कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे, उपाध्यक्ष स्वप्नील शेजवळ, सचिव नीलम चौधरी, सहसचिव दिपक बागुल, राजलक्ष्मी पुजारे, अशोक कांबळे, सुनील जाधव, सिद्धार्थ वाघमारे, बाबा रामटेके, राजू काऊतकर, चारुशीला पाटील, गोपाल शर्मा, संभाजी मोरे, संदीप शेंडगे, जितेंद्र कानाडे, अब्बास घडीयाली, ओमकार मणी, इब्राहीम इनामदार, दीपक मोरे, अक्षय शिंदे, एकनाथ जाधव, सुरेश काटे, अतुल फडके. सिद्धार्थ कांबळे, महेश गीते, इम्तियाज खान, दत्तात्रय बाठे, संतोष होळकर, दिनानाथ कदम, भाग्यश्री प्रधान, हरदीप कौर, दिनेश जाधव, प्रमोद तांबे आदींसह इतर अनेक पत्रकार उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web