कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याण शहर भाजपने निदर्शने केली. कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात वक्तव्य केले. ज्याचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उमटताना दिसत आहेत. कल्याण पश्चिमेतील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात देखील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्याम मिरकुटे, माजी नगरसेवक दया गायकवाड, भाजपा कल्याण शहर सचिव संजय कारभारी, कल्याण पश्चिम उपाध्यक्ष सुधीर वायले यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web