उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट निर्यातदारांना राज्यस्तरीय निर्यात पुरस्काराने गौरविण्यात येणार असून यामध्ये मोठे उत्पादन घटक, लघु उत्पादन, मर्चंट निर्यातदार, एक्सपोर्ट हाऊस, ट्रेड हाऊस, राज्य शासनाचे महामंडळे, सेवा निर्यातदार, विभागीय कार्यालयामार्फत पुरस्कारीत लघु उद्योजक घटक यांचा समावेश आहे. इच्छुकांनी उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी आठ दिवसात अर्ज करावे, असे आवाहन ठाणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अ.ता.पाटील यांनी केले आहे.

कोविड-१९ च्या प्रादुभार्वामुळे सन २०१८-१९ व २०१९-२० चे निर्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत. सन २०१८-१९ पासून २०२१-२२ पर्यंतच्या आर्थिक वर्षातील पुरस्कार देण्याचे सन २०२२-२३ या वर्षात प्रस्तावित आहे. यामध्ये मोठे उत्पादन घटकासाठी अकरा पुरस्कार, लघु उत्पादनासाठी चौदा पुरस्कार, मर्चंट निर्यातदार, एक्सपोर्ट हाऊस,ट्रेड हाऊस,स्टेट गव्हनमेंट कार्पोरेशन,सेवा निर्यातदारासाठी प्रत्येकी एक, विभागीय कार्यालयामार्फत पुरस्कारीत लघु उद्योजक घटकासाठी सहा पुरस्कार आहेत. पुरस्कारासंदर्भात अर्जाचा नमुना https://mhexport-maharashtra.in/exportFacilities#sec२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उद्योजकांनी आठ दिवसांचे आत जिल्हा उद्योग केंद्र ठाणे कार्यालयात अर्ज जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web