डोंबिवलीतील रोटरी गार्डनचे नूतनीकरन प्रगतीपथावर, २५ डिसेंबरला होणार लोकार्पण

नेशन न्युज मराठी टिम.

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – औद्योगिक विभागातील रोटरी गार्डनचा कायापालट मानस रोटरी क्लब ऑफ ईस्ट संस्थेच्या मार्फ़त सुरु आहे. रोटरी गार्डनमध्ये असणाऱ्या फुलपाखरू गार्डन आणि आयुर्वेदिक गार्डन सुधारणासह मुलांना खेळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपकरणे, लहान मुलांसाठीसाहसी खेळ आणि ग्रीन झोन अशा प्रकारची विकास कामे होत आहेत. यासाठी निधी संकलन करण्यासाठी २३ डिसेंबरला प्रसिध्द गायक सुदेश भोसले यांच्या गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कायापालट झालेल्या नव्या गार्डनचे उदघाटन कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते २५ डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. अशी महिती असल्याची माहिती रोटरी क्लब डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष विजय डुंबरे यांनी दिली.

शहरात रोटरी गार्डन आणि रोटरी भवन  र्वात मोठे आहे. शहरातील लोकसंख्या बघता ही गार्डन खूप अपुरी पडत होती. मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे गार्डनमध्ये सुधारणा करता आली नाही. काही कामे करणे खूप गरजेचे होते. येथील गार्डनमध्ये मुलांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. त्यामुळे आता पंधरा हजार स्क्वेअर फुट मध्ये पाच वर्षाच्या खालील मुलांसाठी वेगळी गार्डन आणि पाच वर्षांच्या वरील मुलांसाठी वेगळी गार्डन अशा प्रकारचा विकास काम करण्यात आले आहे.

यासाठी मोठ्या निधीची गरज होती. त्या निधीच्या माध्यमातून गार्डनमध्ये बरीचशी खेळणी उपलब्ध केली आहेत. या निधी संकलनासाठी  23 डिसेंबरला महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रंगमंदिरात सुदेश भोसले यांच्या गाण्याचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो निधी जमा होईल तसेच रोटरीच्या काही सदस्यांनी सढळ हस्ते मदत देण्याचे ठरवले आहे. ते नेहमीच अशा प्रकारचे सहकार्य करत असतात. सहरहू कायापालट झालेल्या नव्या गार्डनचा उदघाटन सार्वजिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते 25 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता रोटरी भवन येथे होणार आहे. या उदघाटन प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष विजय डुंबरे यांनी दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web