यंदाचा आगरी महोत्सव १२ ते १९ डिसेंबरला, मुख्य आकर्षण असणार दि.बा. पाटील यांचा माहितीपर स्टॅाल

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – १८ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सव हा १२ ते १९ डिसेंबर दरम्यान असणार आहे. यंदाच्या आगरी महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे ते आदरणीय दि.बा. पाटील साहेब यांचा माहितीपर स्टॅाल. या स्टॅालच्या माध्यमातून दि. बा. पाटील यांचा जीवनपट उलघडणार आहे. यात त्याची संपूर्ण माहिती असणार आहे. दि. बा. चे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी सर्वसमावेशक असे आंदोलन झाले त्यांचे कार्य हे खूप मोठे होते.दि. बा. चे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात आले. त्याच्या कार्याची ओळख या माध्यमातून नवीन पिढीला व्हावी हा या मागचा प्रमुख उद्देश आहे.

त्याच बरोबर बारा बलुतेदार पद्धत हि थीमही या वेळी आहे. जुन्या काळी एकमेकांना वस्तूचे आदान प्रदान करून आपल्या गरजा भागवल्या जात होत्या थोडक्यात त्या वेळी वस्तू विनिमय पद्धत होती या पद्धतीची ओळख हि या महोत्सव माध्यमातून करून देण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी माध्यमांना दिली.

१८ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पूर्वेकडील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकुलात होणार आहे.१२ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या आगरी महोत्सवात उदघाटन सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,केबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, इतर नेतेमंडळी , माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

याबाबत माहिती देताना गुलाब वझे म्हणाले, कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर साजरा होणा-या येत्या महोत्सवात आनंदाच्या पर्वणी आनंद लुटण्यासाठी जनसागर उसळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन महत् भेट देणा-या आबालवृद्धांना, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, खरेदीसाठी येणा-यांना मनपसंद वस्तूच्या खरेदीचा आनंद घेता यावा, संगीतनृत्यप्रेमींना आगरी-कोळी गीतांवरील नृत्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, खवय्यांना स्वादीष्ट आगरी-कोळी खादय पदार्थावर मनसोक्त ताव मारता यावा, बच्चे कंपनीबरोबर त्यांच्या पालकांनाही आकाश पाळण्यात बसून आकाशाएवढा आनंद घेता यावा, म्हणून महोत्सव संयोजन समितीने अत्यंत नियोजनबद अशी कार्यक्रमांची आखणी केलेली आहे.

‘मराठी भाषा व मराठी शाळा वाचवा’ विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात प्रकाश पायगुडे व माजी आमदार बाळाराम पाटील हे आपले विचार मांडणार आहेत . ‘भूमिपुत्रांचे भवितव्य’ विषयावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, दशरथ पाटील व प्रसिद्ध अर्थतज्ञ जे.डी. तांडेल हे आपले विचार मांडतील.

‘चला तरुणांनो उदयोजक बनू या’ विषयावर प्रा.नामदेवराव जाधव मार्गदर्शन करणार आहेत.
युवा पिढीला उद्योगा कडे नेण्याचा हा एक छोटासा प्रयत्त्न आयोजकान कडून असणार आहे

महिला सन्मानार्थ महोत्सव एक दिवस महिलांसाठी राखून ठेवला असून त्यादिवशी सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे. महिलांचा अध्यात्मिक मंत्रातही सक्रिय सहभाग घेऊया यासाठी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे “ज्ञानबातूकाराम” च्या जयति टाळसूदंगाच्या गजरात श्रीसंत सावळारामा प्राकुलातील वातावरण मंगलमय होणार आहे.त्याप्रमाणे खास महिलांसाठी “यशस्वी व आनंदी जीवनाची सूर्य या विषयावरील चर्चासत्र घेतले जाणार आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web