नोव्हेंबर मध्ये जीएसटीतून १,४५,८६७ कोटी रूपयांच्या महसूलाचे संकलन

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) महसूल 1,45,867 कोटी रूपये आहे. त्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) 25,681 कोटी, राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) 32,651 कोटी, एकात्मिक  वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) 77,103 कोटी (त्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर जमा झालेले 38,635 कोटी रुपयांचा समावेश आहे) आणि 10,433 कोटी रूपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 817 कोटींसह) सेस अर्थात उपकर आहे.

सरकारने नियमित सेटलमेंट म्हणून आयजीएसटीमधून 33,997 कोटी रूपये सीजीएसटीला आणि 28,538 कोटी रूपये एसजीएसटीला दिले आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये नियमित सेटलमेंटनंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 59678 कोटी आणि एसजीएसटीसाठी 61189 कोटी आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने नोव्हेंबर 2022 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी भरपाई म्हणून 17,000 कोटी जारी केले होते.

नोव्हेंबर 2022 चा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 11% जास्त आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हा महसूल 1,31,526 कोटी रूपये होता. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल 20% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात मिळालेल्या महसुलापेक्षा 8% जास्त आहे.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलाचा कल दाखवितो. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत नोव्हेंबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या जीएसटीची राज्यवार आकडेवारी.

State-wise growth of GST Revenues during November 2022[1]

StateNov-21Nov-22Growth
Jammu and Kashmir38343012%
Himachal Pradesh762672-12%
Punjab1,8451,669-10%
Chandigarh180175-3%
Uttarakhand1,2631,2801%
Haryana6,0166,76913%
Delhi4,3874,5664%
Rajasthan3,6983,618-2%
Uttar Pradesh6,6367,2549%
Bihar1,0301,31728%
Sikkim2072091%
Arunachal Pradesh406255%
Nagaland303411%
Manipur355042%
Mizoram23243%
Tripura58603%
Meghalaya1521626%
Assam9921,0809%
West Bengal4,0834,3717%
Jharkhand2,3372,5519%
Odisha4,1364,1621%
Chhattisgarh2,4542,4480%
Madhya Pradesh2,8082,8903%
Gujarat9,5699,333-2%
Daman and Diu0067%
Dadra and Nagar Haveli27030413%
Maharashtra18,65621,61116%
Karnataka9,04810,23813%
Goa518447-14%
Lakshadweep20-79%
Kerala2,1292,094-2%
Tamil Nadu7,7958,55110%
Puducherry17220922%
Andaman and Nicobar Islands2423-7%
Telangana3,9314,2288%
Andhra Pradesh2,7503,13414%
Ladakh1350273%
Other Territory9518493%
Center Jurisdiction180154-14%
Grand Total98,7081,06,4168%
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web