केडीएमसीची एकल वापर प्लास्टिक बंदी आणि कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती मोहीम

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापन विभाग, राष्ट्रीय सेवा योजना प्रगती महाविद्यालय, पर्यावरण दक्षता मंडळ, ऊर्जा फाउंडेशन, श्री लक्ष्मीनारायण संस्था आणि स्वच्छ डोंबिवली अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आज डोंबिवलीमध्ये एकल वापर प्लॅस्टिक बंदी आणि कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

डोंबिवली पूर्व वाहतूक पोलिस कार्यालयापासून या जनजागृती मोहिमेस प्रारंभ झाला.

शिवमंदिर रोड, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, टंडन रोड, मासळी-भाजी मार्केट परिसर, नेरूरकर रोड, स्वामी विवेकानंद शाळा दत्तनगर परिसरातील भाजीवाले, फेरीवाले, नागरिक यांना कचरा वर्गीकरण तसेच एकल वाटप प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून देताना प्लॅस्टिक वापरास असलेल्या दंडात्मक कारवाईबाबत प्रबोधन करण्यात आले. या जनजागृती मोहिमेची सांगता विवेकानंद शाळा दत्तनगर येथे झाली.

या मोहिमेमध्ये आयोजक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित नागरिक, फेरीवाले/भाजी विक्रेते, दुकानदार यांना एकल वापर प्लॅस्टिकचे दुष्परिणाम आणि एकल वापर प्लॅस्टिक दंडात्मक कारवाई तसेच घरगुती कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनाबाबत अवगत केले.

या उपक्रमात क.डों.म.पा. ग प्रभागाचे सहा. आयुक्त, स्वच्छ्ता अधिकारी, सर्व आयोजक संस्थांचे प्रतिनिधी/ कार्यकर्ते, प्रगती महाविद्यालय प्राध्यापक आणि NSS Unit चे विद्यार्थी उपस्थित होते.

सदर उपक्रमास आजूबाजूच्या परिसरातील भाजीवाले, फेरीवाले आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल जागृत झालेल्या नागरिकांनी आणि फेरीवाले/दुकानदार यांनी एकल वापर प्लॅस्टिक न वापरण्याचे आश्वासन दिले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web