नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
मुंबई/प्रतिनिधी – रियर ॲडमिरल संदीप मेहता, व्हीएसएम,, यांनी 28 नोव्हेंबर 2022 रोजी आयएनएस कुंजली परेड मैदानावर आयोजित एका भव्य औपचारिक पथसंचलन सोहळ्यात रियर ॲडमिरल एएन प्रमोद यांच्याकडे महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या कमांडिंग फ्लॅग ऑफिसरचा बॅटन सुपूर्द केला.
1 जुलै 1990 रोजी भारतीय नौदलात नियुक्त झालेले रियर ॲडमिरल प्रमोद हे पात्र नौदल हवाई संचालन अधिकारी आणि संचार व इलेक्ट्रॉनिक युद्ध विशेषज्ञ आहेत. ते प्रतिष्ठित नौदल अकादमी, गोवा, संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय, वेलिंग्टन आणि नेव्हल वॉर कॉलेज, गोवा मधील माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आयएनएस अभय, शार्दुल आणि सातपुडा या जहाजांची आणि आयएनएस उत्क्रोश या नौदल हवाई तळाचीही धुरा त्यांनी सांभाळली होती. ते पश्चिमी ताफ्याचे फ्लीट ऑपरेशन्स अधिकारी होते तसेच आयएनए चे डेप्युटी कमांडंट आणि सहाय्यक नौदल प्रमुख (हवाई ) म्हणूनही ते कार्यरत होते.
रियर ऍडमिरल संदीप मेहता यांची नौदल मुख्यालय, नवी दिल्ली येथे कॅरिअर प्रकल्पांचे सहाय्यक प्रमुख आणि युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण सहाय्यक नियंत्रक म्हणून नियुक्ती झाली आहे.