नाळे वस्ती जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर/प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील विहाळ येथील नाळे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक शिक्षक गेल्या अनेक दिवसापासून गैरहजर असून सदरील शिक्षक गेल्या सहा महिन्यापासून शाळेमध्ये व्यवस्थितपणे काम करत नाही त्यामुळे या कामचुकार शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी सरपंच युवराज नाळे व ग्रामस्थांनी केली आहे.

शाळेतील शिक्षकाच्या अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालवलेले आहे शाळेमध्ये अस्वच्छता, शाळेमध्ये पूरक पोषण आहार न वाटणे, विद्यार्थ्यांना न शिकवणे, शाळेमध्ये नशा करणे, शाळेला उशीरा येणे कुठलेही शालेय रेकॉर्ड व्यवस्थितपणे न ठेवता गावकऱ्यांनाच अरेरावीची भाषा करणे, तसेच हा शिक्षक विना परवानगी कुठलीही रजा न घेता नशा करून करमाळ्यामध्ये मोकाट फिरत आहे, प्रशासनाकडून अनेक वेळा या शाळेवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन या शिक्षकाला समज दिली परंतु हा शिक्षक कोणालाच जुमानायला तयार नाही, त्यामुळे सदरील शिक्षकावर तात्काळ कार्यवाही व्हावी म्हणून गावचे सरपंच युवराज नाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गावातील ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती करमाळा व गटविकास अधिकारी करमाळा यांच्याकडे या शिक्षकांचा पगार बंद करून याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचा ठराव दिलेला आहे.
सदरील शिक्षकाच्या वेळोवेळी अनेक वेळा ग्रामस्थांच्या वतीने तक्रारी दिल्या असल्यामुळे पुढील काळात या शिक्षकाला आमच्या गावातील शाळेवर पाठवू नये अशा पद्धतीची विनंती ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला केली आहे. वरील सगळ्या बाबींचा विचार करून प्रशासनाने सदरील शिक्षकावर योग्य ते निर्णय घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळे वस्ती या शाळेसाठी एक नवीन शिक्षक द्यावा अशी विनंती ग्रामस्थाकडून करण्यात आली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web