लोहगाव विमान तळावरील बहुमजली वाहन तळाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

पुणे/प्रतिनिधी -पुण्यातील लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेल्या एरो मॉल या बहुमजली वाहन तळाचे उद्घाटन आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, भारतीय विमानतळ प्राधिकरण चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

लोहगाव विमानतळाच्या नवीन इमारतीचे आणि कार्गो सुविधेचे काम येत्या 6 महिन्यात पूर्ण केले जाईल असे सिंधिया यांनी यावेळी बोलताना सांगितले . ते पुढे म्हणाले की  पुण्यातून बँकॉक विमानसेवा सुरू करण्यात आली असून पुढील महिन्यात थेट सिंगापूर साठी विमानसेवा सुरू करण्यात येईल . पुण्यातून सध्या आठवड्याला 1600 उड्डाणे होतात त्यात वाढ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले . मुंबई प्रमाणेच पुण्याचाही विकास केला जाईल असे त्यांनी सांगितले.

केवळ देशातीलच नव्हे तर जगातील नवरत्न म्हणून पुण्याचा विकास केला जाईल असे सांगून सिंधिया म्हणाले की ,  पुणे आणि कोल्हापूर  महत्वाची शहरे आहेत . त्यांचा सुयोग्य विकास व्हावा यादृष्टीने अनेकविध उपाय योजना केल्या जातील.

एरोमॉलची वैशिष्ट्ये

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २०२० साली पेबल्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लि. च्या सहयोगाने हा  मल्टीलेव्हल पार्किंग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.

नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. १२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पाच मजली एरोमॉलमध्ये सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगची सोय असणार आहे. केवळ कार पार्किंगच नाही तर येथे प्रवाशांच्या सुविधांसाठी दालने, फुडकोर्ट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याशिवाय विमानांची आवागमन स्थिती दर्शविणारे डिस्प्लेज् पार्किंग इमारतींच्या सर्व मजल्यांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांच्या वेळा समजण्यास मदत होणार आहे.

या पार्किंगसाठी प्रवाशांना फास्टस्टॅग, क्रेडिट कार्ड, पे ऑन फूट, मोबाईल अॅप व्दारे पेमेंट करता येईल. ज्यामुळे प्रवाशांची सोय व इमारतीतून लवकर बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तसेच ‘फाईंड माय कार’ तंत्रज्ञान सुविधेच्या माध्यमातून आपली कार कोणत्या मजल्यावर पार्क आहे हे जाणता येणार आहे.:तसेच विमानतळावर येण्या-जाणाऱ्या प्रवाशांना लिफ्ट, फुट ओव्हर ब्रीज, स्वयंचलित जिन्यांची पुरेशा संख्येने सुविधा आहेतच, त्यासोबतच विमानतळ ते कार पार्किंग दरम्यान जाण्या – येण्यासाठी वृद्धांसाठी पर्यावरणपूरक गोल्फ कार्टची (कार) व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.

प्रवाशांना सोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या चालकांना विश्रांतीसाठी येथे खास विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे.प्रवासी व अन्य नागरिकांकरिता हे पार्किंग  २४ तास सुरू असणार आहे. येथे त्यांना २४ तास पार्किंग सुविधेसह चांगल्या दर्जाच्या खाद्यपदार्थची चव चाखता येणार आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर छोट्या व तातडीच्या व्यावसायिक मिटिंग्जसाठी सशुल्क जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.एकंदर ४ लाख ५० हजार स्केअर फूट एवढ्या जागेत या मॉल ची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख स्केअर फूट जागेचा वापर केवळ पार्किंगसाठी तर उर्वरित १ लाख ५० हजार स्केअर फूट जागेचा व्यावसायिक वापर करण्यात आला आहे . इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंगमध्येच चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली असून इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ग्रीन एनर्जीचा वापर इमारतीसाठी होणार आहे. ज्यातून पर्यावरण संरक्षणासाठीचे प्रयत्न केला गेलेला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web