जळगाव मध्ये “भारताचे संविधान” या विषयावरील मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

जळगाव/प्रतिनिधी – संविधान दिना निमित्त भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, जळगाव आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान खान्देश मॉल, स्टेशनरोड, जळगाव येथे “भारताचे संविधान” व शासनाच्या विविध योजना या विषयावर मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन 26 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता होणार आहे. याप्रसंगी खासदार, उन्मेषदादा पाटील, पालकमंत्री, गुलाबराव पाटील, आमदार राजू भोळे, महापौर, जयश्री महाजन, उपमहापौर, कुलभूषण पाटील कार्यक्रमाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जळगावचे सहा. आयुक्त योगेश पाटील, केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

सदर प्रदर्शनात भारताचे संविधान आणि शासनाच्या योजनांची माहिती सांगणारे सचित्र छायाचित्रे , तसेच डिजीटल वॉल, एलएडी टिव्हीवर चलचित्र स्वरूपात माहिती असणारे विविध चित्रपट/माहिती पट दाखवण्यात येतील . तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या माहितीचा समावेश आहे. सदर प्रदर्शन 26 ते 28 नोव्हेंबर, 2022 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 9 या वेळेत सर्वांसाठी विनमूल्य सुरू राहणार आहे. चित्रप्रदर्शनीच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, विविध स्पर्धा आदीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाला नागरीकांनी मोठ्या भेट देऊन भारताचे संविधान व शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, जळगाव व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासन,  जळगाव यांनी केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web