कॉप २७ परिषदेच्या समारोप सत्रात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली भारताची भूमिका

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – यूएनएफसीसीसीच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या कॉप 27 परिषदेच्या 27 व्या सत्राचा समारोप आज शर्म अल-शेख इथं पार पडला. याआधी विविध पातळ्यांवर मिळवेलेल्या यशाला नव्या उंचीवर नेणं, आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचा मार्ग प्रशस्त करणं हा या परिषदेचा उद्देश होता. या परिषदेचा समारोपावेळी सर्व देशांनी हवामान विषयक जगातिक सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने एकत्र येत पावले उचलण्यासाठी वचनबद्धा प्रकट केली. या परषदेसाठीच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेते तसेच केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी भारताची भूमिका मांडली. यालेली ते म्हणाले कि

अध्यक्ष  महोदय एका ऐतिहासिक कॉप परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहात. या परिषदेत तोटा आणि नुकसानविषयक अर्थसहाय्याची व्यवस्था करण्यासोबतच, तोटा आणि नुकसान निधी स्थापन करण्याविषयीच्या कराराची सुनिश्चिती केली गेली आहे. जग बराच काळ या घटनेची प्रतिक्षाच करत होता. या सगळ्यात आपण , सर्वसहमती घडवून आणण्यासाठी जे अथक प्रयत्न केले, त्यासाठी आम्ही आपले अभिनंदन करत आहात.

हवामान बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी प्रमुख निर्णयांमध्ये शाश्वत जीवनशैलीकडे वळण्याच्या प्रयत्नांसोबतच वस्तुंचा वापर आणि उत्पादनाच्या पद्धतींचा समावेश करायच्या निर्णयाचंही आम्ही स्वागत करत आहोत.

कृषी आणि अन्न सुरक्षेसाठी आपण 4 वर्षांचा हवामान विषयक कृती कार्यक्रम आखणार असल्याचीही आम्ही दखल घेतली आहे.

लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या कृषी क्षेत्राला हवामान बदलाचा मोठा फटका बसणार आहे. हे लक्षात घेऊन आपण या वर्गावर हवामान बदलाशी संबंधीत उपाययोजनांच्या जबाबदाऱ्यांचा भार टाकू नये असे वाटते.

खरं तर त्यामुळेच भारताने हवामान बदलविषयक आपल्या राष्ट्रीय पातळीवरच्या योगदानात कृषी क्षेत्राचा समावेश केलेला नाही.

आम्ही केवळ हवामान बदलामुळे कराव्या लागणाऱ्या संक्रमणाशी संबंधित एक कृती कार्यक्रमही सुरू करणार आहोत. 

बहुतेक विकसनशील देशांच्यादृष्टीनं पाहीलं तर, त्यांच्या या  संक्रमणाची तुलना केवळ कार्बनमुक्तीशी नाही तर कमी-कार्बन उत्सर्जनासह राबवल्या जाणाऱ्या विकास प्रक्रियेशी केली गेली पाहीजे .

विकसनशील देशांना त्यांच्या ऊर्जा मिश्रणातील घटक निवडण्याचे, आणि शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठीचे धोरण निवडीचे स्वातंत्र्य असले पाहीजे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर विकसित देशांनी हवामान बदलविषक कृतींमध्ये पुढाकार घेणे हा न्याय्य पद्धतीनं संक्रमणाची वाटचाल होण्याच्यादृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. असेही ते म्हणाले

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web