भारतीय दालनाने जागतिक प्रेक्षकांसमोर सादर केले ‘मिशन लाईफ’

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारताने 6 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत शर्म अल शेख येथे COP 27 मध्ये LiFE- पर्यावरणासाठी जीवनशैली या संकल्पनेवर आधारित विशेष दालन उघडले होते. विविध ऑडिओ-व्हिज्युअल, लोगो, 3D मॉडेल्स, सजावट, भेट अप्स आणि इतर उप कार्यक्रमांद्वारे LiFE चा संदेश देण्यासाठी या दालनाची रचना करण्यात आली होती.

COP 27 च्या संपूर्ण कालावधीत या दालनात इतर अनेक उप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या उप कार्यक्रमांच्या आयोजकांमध्ये केंद्र सरकारची मंत्रालये, राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), स्वायत्त संस्था / अधीनस्थ संस्था, विचारवंत आणि संयुक्त राष्ट्र संस्थांचा समावेश होता. दालनात आ 49 उप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यापैकी 16 कार्यक्रमांचे आयोजन केंद्र सरकारने तर 10 कार्यक्रमांचे आयोजन राज्य सरकारांनी केले होते. या खेरीज या दालनात 23 खाजगी क्षेत्रातील कार्यक्रमही पाहायला मिळाले.

या दालनाचे उद्घाटन 6 नोव्हेंबर रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि UNICEF यांनी संयुक्तरीत्या COP 27 तरुण विद्वान पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कठोर निवड प्रक्रियेतून निवडलेल्या चार तरुण विद्वानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय दालनात 14 नोव्हेंबर हा दिवस LiFE संबंधित कार्यक्रमांना समर्पित करण्यात आला होता. पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैलीच्या प्रचारात युवक आणि मुलांचा सहभाग दर्शवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या कार्यक्रमांचे आयोजनही याच दिवशी करण्यात आले होते.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 14 नोव्हेंबर रोजी या दालनात भारताच्या दीर्घकालीन कमी उत्सर्जन विकास धोरणाचे (LT-LEDS) प्रकाशन केले. मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतीय दालनात इं लीडआयटी शिखर परिषद निवेदन जारी केले. तसेच LiFE “प्रयास से प्रभाव तक” चा सारांश देखील जारी केला. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिव लीना नंदन यांनी देखील भारतीय दालनात आयोजित उप कार्यक्रमात सहभाग नोंदवला ज्यात तंत्रज्ञान गरज मुल्यांकनावरील DST कार्यक्रम आणि TERI च्या अनुकूलन आणि अनुकूलन तयारी प्रकल्पावर दीर्घकालीन रणनैतिक कार्यक्रमाचा समावेश आहे. 12 दिवसांच्या कालावधीत आयोजित विविध उप कार्यक्रमात अंदाजे 2000 सहभागींनी सहभाग घेतला.

दालनाला सुमारे 25000 COP सहभागींनी भेट दिली. भारतीय दालनाने अभ्यागतांना भारतीय संस्कृती, कापड आणि खाद्यपदार्थ यावरील प्रदर्शनासह तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान बदलातील भारताच्या कामगिरीचे प्रदर्शन करून मंत्रमुग्ध केले. दालनात आयोजित ब्लॉक प्रिंटिंग उपक्रमात COP मधील तरुण सहभागींनी विशेषत्वाने मोठा सहभाग नोंदवला. दालनात अभ्यागतांना LiFE बॅज आणि पुस्तिका वाटप तसेच विविध उपक्रमांद्वारे मिशन लाईफचा संदेश देण्यात आला.

ठळक मुद्दे:

  • दालनामध्ये हवामान बदल क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले.
  • LT-LEDS, LiFE प्रयास से प्रभाव तक यासारखी महत्वाची कागदपत्रे प्रसिद्ध झाली.
  • दालनाला सुमारे 25000 COP सहभागींनी भेट दिली.
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web