इतकी वर्षे काँग्रेसची सत्ता होती,मग राहुल गांधीना भारत जोडोची आत्ताच आठवण का आली-केंद्रीय मंत्री नारायण राणे

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – इतकी वर्षे काँग्रेसची देशामध्ये सत्ता होती तर मग राहुल गांधीना भारत जोडोची आत्ताच का आठवण आली .राहुल गांधी देशात सत्तेसाठी भारत जोडो यात्रा करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी डोंबिवली एका खाजगी कार्यक्रमात केली . तसेच नारायण राणे यांनी विरोधकांवर घणाघाती टीकेची झोड उठविली .

डोंबिवली पश्चिमे कडील ठाकूरवाडी येथील एका खाजगी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी केद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहिले होते त्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविद्र चव्हाण ही कार्यक्रमास उपस्थित होते.या कार्यक्रमा दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकाराच्या प्रश्नाना उतरे देताना त्यांनी आपल्या शैलीत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावर तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यावर टीकेची झोड उठविली .राहुल गांधी देशभरात भारत जोडो ची यात्रा करीत आहेत मग इतकी वर्ष कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती ना त्याना भारत जोडोची आत्ताच कशी आठवण आली . भारत जोडोच्या यात्रेत ते महाराष्ट्रात आले खरे मात्र महाराष्ट्रात नवीन कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले नसल्याचे त्यांनी नमूद करत तेच तेच चेहरे आजूबाजूला दिसत असल्याचे सांगितले.

स्वा.सावरकरांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला आहे.महाराष्ट्रात सुरु असलेली भारत जोडो ची यात्रा शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सगळ्या महाविकास आघाडीतील पक्षाची सत्ते साठी सध्या भारत जोडो सुरू असल्याची टीका नारायण राणे यांनी यावेळी केली. या तीन पक्षाची मने जुळलेली नाहीत . सत्तेसाठी फक्त एकत्र येतात. यामध्ये त्यांना काही यश मिळणार नाही.सध्या देशभरात पंतप्रधान मोदी जे कार्य करत आहेत ते प्रशंसा करण्यासारखे आहे. यामुळे भारताची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. जगात असे कर्तृत्वान नेते म्हणून त्यांचा गौरव होतो यापेक्षा आणखी काय हवं असे कौतुकास्पद उदगार त्यांनी पंतप्रधान यांच्याबद्दल काढले.आदित्य ठाकरे हे बालीश असून सावरकरांचा इतिहास त्यांना आणि त्यांचे वडील उद्धव ठाकरे याना माहिती नाही. त्यामुळे त्यांना राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे गांभीर्य कळले नाही असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. सावरकरांचे देशासाठी योगदान खूप मोठं असून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते ते आदित्य ठाकरेंना माहिती नसल्याची खोचक टीका त्यांनी केली.हे फक्त त्या यात्रेत फोटो काढण्यासाठी गेले त्यामुळेच त्यांना या वक्तव्याचे गांभीर्य नसल्याने त्यांना कोणतीही चीड आली नाही का असा सवाल उपस्थित केला.

शिवसेनेवर टीका केल्या शिवाय नारायण राणे यांचे प्रमोशन होत नसल्याची टीका शिवसेनेच्या उप नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली होती या टिकेचा समाचार घेत नीलम ताई विसरल्या असतील पण माझ्या शिफारशी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या असा गौप्य स्फोट केला. त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रीपद दिल नाही त्यामुळे देखील ताई नाराज होत्या. मी सांगितल्या नंतर तरी ताईना आठवेल अशी आशा आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई यांनी सध्या महाराष्ट्रात सध्या बदला घेण्याचे राजकारण सुरू आहे असे म्हंटले होते. याबाबत बोलताना ते म्हणाले पूर्वी बदले घेतले जायचे पण दाखवले आणि सांगितले जायचे नाही. अगदी बुखारी पासून आत्ता पर्यंत किती बळी गेले ते नावासकट हवं तर जाहीर करतो असे सुप्रिया सुळे यांना जाऊन सांगा असा टोला त्यांनी लगावला .

आम्ही सध्या विकास आणि कामाच्या जोरावर जिंकून येत असल्याचा त्यांनी दाखला दिला.अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा चौपदरी रस्त्याचे काम राखडल्याने चक्रमान्यांची गैरसोय होत असून तो रस्ता केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता त्यांनी संगीतले की, या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या कामाचा कंत्राटदार पळून गेल्याने काम थांबले होते. पण आता नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली असून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कार्य तत्पर मंत्री असल्याने या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल असे सांगितले

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web