केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८ नोव्हेंबरला डोंबिवली मध्ये येणार आहे.सावंत हॉस्पिटलच्या उद्द्घाटन कार्यक्रमासाठी ते डोंबिवलीत येणार आहे. अशी माहिती सावंत हॉस्पिटलचे डॉक्टर सर्वेश शाहू सावंत यांनी दिली.

नारायण राणे हे नाव महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्वाचे नाव आहे.राज्याच्या राजकारणात आताच मोठी उलथापालथ झाल्याची आपणास दिसून आली आहे.त्यातच राणे डोंबिवली येथे येणार आहेत कारण जरी हॉस्पिटलच्या उद्दघाटनाचे असले तरी डोंबिवली हा भाजपचा बाल्ले किल्ला आहे. राणे येण्यामुळे येथे भाजपची ताकद आणखीन वाढणार यात नाममात्र शंका नाही. डोंबिवलीत राणे भरपूर कालावधी लोटल्या नंतर येणार आहेत त्यामुळे त्याच्या चाहत्या मध्ये उत्सवाचे वातावरण दिसते.त्याच बरोबर उद्या मंत्री राणे काय बोलतात याच्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

माझे वडील कै. शाहू सावंत याच्यामुळे डोंबिवलीशी राणे साहेब यांची नाळ घट्ट रोवली आहे.त्याच बरोबर डोंबिवलीत कोकणी लोकसख्या जास्त प्रमाणात आहे त्यात राणे साहेबांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच बरोबर राणे साहेबांचे कोकणातील हॉस्पिटल जशी चागल्या प्रकारे रुग्णसेवा करीत आहे त्याची प्रेरणा घेऊन नवीन सुरुवात होणारे सावंत हॉस्पिटल रुग्ण सेवेत रुजू होईल असे सावंत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सर्वेश सावंत यांनी सागितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web