मिझोराम विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींची उपस्थिती

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या मिझोरम दौऱ्यात, मिझोरम विद्यापीठामधील आयआयएमसी ईशान्य शाखेचे दूरदृश्य माध्यमातून उद्घाटन केले. भारतीय जनसंवाद संस्था (आयआयएमसी) ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे.

आयआयएमसी ईशान्य शाखेने 2011 मध्ये मिझोराम विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या तात्पुरत्या इमारतीतून कामाला सुरुवात केली. शाखेचे बांधकाम 2015 मध्ये सुरू झाले आणि 2019 मध्ये पूर्ण झाले. यासाठी एकूण खर्च 25 कोटी झाला आहे. मिझोराम विद्यापीठाने दिलेल्या 8 एकर जागेवरील आयआयएमसीच्या कायमस्वरूपी शाखेत वसतिगृहे आणि कर्मचारी निवासस्थानांसह स्वतंत्र प्रशासकीय आणि शैक्षणिक इमारती आहेत.

शाखेत स्थापनेपासूनच इंग्रजी पत्रकारितेतील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शिकवला जात आहे. यात बहुतेक भारताच्या इतर भागातील तर काही पूर्वोत्तर राज्यांमधील विद्यार्थी प्रवेश घेतात. यावर्षी इंग्रजी पत्रकारितेत दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावल्याचा संस्थेला अभिमान आहे. संस्थेद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट आणि त्यांच्या स्वत:च्या प्रयत्नांद्वारे देशभरातील नामांकित प्रसारमाध्यमांमधे रोजगार सुनिश्चित करण्यास सक्षम केले जाते.  वर्षानुवर्षे विद्यार्थी दूरदर्शन सारख्या प्रतिष्ठीत माध्यम संस्थांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत.

आयआयएमसीच्या इतर दोन शाखांसह ईशान्य शाखेची डिजिटल माध्यमात 2022-23 सत्रापासून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निवड झाली आहे. सद्यस्थितीत डिजिटल माध्यमाचे महत्त्व लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

मिझोरम विद्यापीठामधील शाखेत काम सुरू केल्यापासून शैक्षणिक आणि प्रशासकीय सहाय्य प्रदान केल्याबद्दल तसेच सर्वोतोपरी योगदान दिलेल्या सर्व लोकांचे, विशेषतः मिझोरम विद्यापीठाप्रति  संस्थेने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

2011 मध्ये उद्घाटन झाल्यापासून, प्रादेशिक संचालक एल.आर. सायलो संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांना जनसंपर्क क्षेत्रात अनेक दशकांचा अनुभव असून मिझेरमचे माहिती आणि जनसंपर्क म्हणून त्यांनी 20 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले आहे.

आयआयएमसी ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रतिष्ठीत पत्रकारिता संस्था आहे. देशातील आणि इतर विकसनशील देशांमधील माध्यम व्यावसायिकांच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी 1965 मध्ये त्याची स्थापना झाली. तेव्हापासून ही भारतीय माहिती सेवेची प्रशिक्षण संस्था म्हणून कार्यरत आहे. नंतर इथे स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेद्वारे इच्छुक पत्रकारांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आयआयएमसीने देशातील माध्यम शिक्षणाची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने देशाच्या विविध भागात 5 प्रादेशिक शाखांचा विस्तार केला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web