नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर पर्येंत

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – NMMSS साठी, 2022-23 या वर्षाकरता अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. या योजने अंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवान विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीतील त्यांची गळती रोखून, माध्यमिक स्तरावर त्यांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता ही शिष्यवृत्ती दिली जाते.  इयत्ता आठवीत शाळा न सोडता इयत्ता नववीत दाखल झालेल्या निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी नव्यानं एक लाख शिष्यवृत्त्या दिल्या जातात आणि राज्य सरकार, सरकारी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणार्‍या या विद्यार्थ्यांसाठी दहावी पासून बारावी पर्यंत शिष्यवृत्ती सुरु राहते किंवा तिचं नूतनीकरण केलं जातं.  शिष्यवृत्तीची रक्कम,प्रतिवर्ष रु.  12000/-.एवढी आहे.

National scholarship portal(NSP),या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनांच्या वन स्टॉप प्लॅटफॉर्मवर(सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेलं पोर्टल-संकेतस्थळ), NMMSS या योजनेची माहिती उपलब्ध आहे. NMMSS शिष्यवृत्तीची रक्कम, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) च्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT), पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट वितरित केली जाते.  ही योजना 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं सर्व स्रोतांमधून वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नाही, ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात.  शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक गुणवत्तेच्या पात्रतेच्या निकषाचा विचार करता, विद्यार्थ्‍यांना इयत्ता 7 वी च्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी प्राप्त असणं आवश्यक आहे. गुणांची ही अट, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 टक्क्यांनी  शिथिल आहे.

पडताळणीचे दोन स्तर आहेत.  संस्था नोडल अधिकारी (INO) हा पहिला स्तर (L-1)आणि जिल्हा नोडल अधिकारी (DNO), हा दुसरा स्तर (L-2)आहे.  पहिल्या स्तरावरील पडताळणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे आणि दुसऱ्या स्तरावरील पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web