तापी नदीपात्रात मालट्रकला जलसमाधी चालक बेपत्ता, शोधकार्य सुरु

नेशन न्यूज मराठी टीम.

धुळे/प्रतिनिधी – सावळदे गावाजवळील तापी पुलावरून आयशर कंपनीचा ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली . या दुर्घटनेत वाहकाला वाचवण्यात यश आले , मात्र चालक बेपत्ता असून ट्रकला जलसमाधी मिळाली . मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर लगत असलेल्या सावळदे गावाजवळ तापी नदीवरील पुलावरून आश्यर कंपनीचा मालट्रक तापी नदी पात्रात पडल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे .

आयशर ट्रक मधील चालक व वाहक हे दोघेही पाण्यात बुडाले मात्र वाहकाला वाचवण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले आहे . चालकाचा मात्र अद्याप शोध सुरू आहे . मालेगावहून इंदूरच्या दिशेने कुरकुरे घेऊन आयशर ट्रक जात होता . चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट नदीपात्रात कोसळला आहे घटनास्थळी तात्काळ शिरपूर पोलीस व महामार्ग पोलीस दाखल होऊन बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web