धुळे/प्रतिनिधी -दादर मध्य रेल्वे स्टेशनच १६ डिसेंबर पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं नामांतरण करण्यात याव अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी बिराड आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय आदिवासी सेनेने निवेदनाच्या माध्यमातून शासनाला दिला आहे.
तसेच या निमित्ताने विविध प्रलंबित मागण्या देखील निवेदनात मांडण्यात आल्या आहे .
गेल्या पंधरा वर्षांपासून दादर मध्य रेल्वेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं नामांतरण करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री व मंत्र्यां कडे करण्यात आली होती. मात्र आज पर्येंत हि मागणी मान्य न झाल्याने अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. 16 डिसेंबर पर्यंत नामांतरण न झाल्यास मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावर बिराड आंदोलन करण्याचा इशारा देखील शासनाला यावेळीअखिल भारतीय आदिवासी सेनेने दिला आहे.