पेशंट नेव्हीगेटर कार्यक्रमाअंतर्गत गेल्या तीन वर्षात चार लाख कर्करोग रुग्णांना मिळाला विशेष सेवा-शुश्रुषेचा लाभ

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – टाटा मेमोरियल सेंटर (TMC) ने यावर्षी, 7 एप्रिल 2022 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत, इंडोनेशियातील कर्क रुग्ण शुश्रुषा सुधारावी, या दृष्टीने ‘कॅन्सर पेशंट नेव्हीगेशन प्रोग्राम’ हा भागीदारी विषयक करार केला होता. धर्माईस नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल आणि पीटी रोच इंडोनेशिया, या दोन वैद्यकीय संस्थांसोबत हा करार करण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत, प्रत्येकी 30 विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांच्या दोन तुकड्यांचा पदवी प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. यात, कॅन्सर पेशंट नेव्हीगेशन प्रोग्राम (CPN) अंतर्गत, त्यांना 100 टक्के नोकरीही मिळणार आहे. ‘टाटा मेमोरियल-केवट’ अभियानाचे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तारीकरण आहे. सध्या, इंडोनेशियातील 37 विद्यार्थ्यांची तिसरी तुकडी हे प्रशिक्षण घेत आहे.

टाटा मेमोरियल सेंटरने केवट या विशेष अभियानाअंतर्गत, निमवैद्यकीय सेवा क्षेत्रात एक नवा पायंडा निर्माण केला.केवट हा कर्करोग रुग्णांना दिशादर्शन करणारा, भारतातील पहिलाच, मान्यताप्राप्त असा हा पदव्युत्तर पदविका प्रशिक्षण अभ्यासक्रम असून या अभियानात प्रशिक्षणार्थींना रोजगाराची हमीही दिली जाते. त्याची जबाबदारी -टीस(TISS) टाटा समाजविज्ञान संस्था आणि टाटा ट्रस्ट ने घेतली आहे. हे प्रशिक्षित नेव्हीगेटर्स, आपले एक प्रभावी संपर्क जाळे तयार करतात, ज्याच्या माध्यमातून कर्करुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबियांना कर्करोग व्याधीग्रस्त काळात सर्वतोपरी मदत मिळण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला जातो.

या केवट अभियानाअंतर्गत, गेल्या तीन वर्षांत, सुमारे चार लाख कर्करोगग्रस्तांना मदत आणि दिलासा देण्यात आला आहे. कोविड महामारीच्या काळात केवट प्रशिक्षितांची ही कार्यशक्ती अतिशय महत्वाची ठरली होती, त्यांनी एक लाख 40 हजार पेक्षा अधिक रुग्णांची रुग्णालयात आल्यावर स्क्रीनिंग म्हणजे प्राथमिक तपासणी करण्यात मोठे योगदान दिले होते. त्याशिवाय, औषधविषयक सेवा आणि सुमारे 70000 रुग्णांचे व्यवस्थापन, प्रशासकीय कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आणि रूग्णांची तपासणी करणे, टेलि- सल्लामसलत सेवा सुलभ करण्यात मदत केली, ज्यामुळे हॉस्पिटलची कार्यक्षमता 100% इतकी झाली.  तर कर्करोगाच्या रूग्णांसाठी 60% आणि कर्करोगाच्या कोविड रूग्णांसाठी ही कार्यक्षमता  40% पर्यंत वापरणे शक्य झाले.

या प्रशिक्षणाअंतर्गत, 36 पदविका अभ्यासक्रम असून, ज्यात सहा महिन्यांचे मार्गदर्शन आणि कर्करोग शुश्रुषेतील वैद्यकीय आणि मानसिक स्वरूपाच्या काळजीसाठी निरीक्षण सांगितले जाते, त्यानंतर, टाटा मेमोरियलच्या कोणत्याही एका रुग्णालयात सहा महिन्यांचा प्रशिक्षणार्थी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, ज्याचे मानधन दिले जाते. या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन ठराविक काळानंतर केले जाते.- ज्यात मध्य सत्र आणि एक टर्म संपल्यानंतरच्या परीक्षा घेतल्या जातात. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदविका प्रदान केल्या जातात. या पदविका धारक प्रशिक्षित विद्यार्थ्यांना देशभरात कुठेही, खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात रुग्णांची काळजी, शुश्रूषा करण्यासाठी नियुक्ती दिली जाते. टीएमसी अशा प्रशिक्षित विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर, एक वर्षाची अध्ययनवृत्तीही देऊ करते. ही अध्ययन वृत्ती यशस्वीपणे पूर्ण केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना टीमसी, कायमस्वरूपी नोकरी देखील देते. हा करार झाल्यानंतर एप्रिल 2022 पासून या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. आणि आता, 25 आरोग्य व्यावसायिक, ज्यात परिचारिका आणि डॉक्टर्सचाही समावेश आहे, त्यांची एक वर्षाच्या कर्करोग रुग्ण नेव्हिगेशन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.

सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विविधतेच्या प्रमुख क्षेत्रांसह रुग्णांच्या उपचाराच्या  अपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. भाषेतील अडथळे, जागरूकतेचा , आरोग्यविषयक माहितीच्या आकलनाचा  संसाधनांच्या तरतुदीचा , वेळेवर निदान होण्याचा  आणि हस्तक्षेप आणि उपचारांसंदर्भातील उद्दिष्टांचे पालन करण्याचा  अभाव   या आढळलेल्या काही चिंतेच्या गोष्टी आहेत.

रुग्णसेवेला  पाठबळ  देण्यासाठी, चिकित्सक आणि परिचारिकांवरील  भार कमी करण्यासाठी, दर्जेदार सेवा  प्रदान करण्यासाठी, उपचार आणि त्यासंदर्भात पाठपुरावा यांचे पालन करण्यासाठी, शारीरिक झीज होण्याचे प्रमाण  कमी करण्यासाठी,उपचाराच्या  मार्फत रुग्णांना जीवनदान देण्याच्या  परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कर्करोग रुग्णालये किंवा विशेष कर्करोग उपचार  सेवा देणार्‍या रुग्णालयांमध्ये रुग्ण मार्गदर्शक  कार्यक्रम विकसित आणि कार्यान्वित करणे याचा या कार्यक्रमाच्या परिणामांमध्ये  समावेश आहे.

चाचणी  आणि प्राथमिक  तपासणी उपक्रम , रुग्णांना कागदपत्रे  आणि नोंदणीसाठी  मदत करणे, असुरक्षित रुग्णांची ओळख पटवणे, रुग्णांची तपासणी करणे, रुग्णाच्या रोग निदानाच्या आकलनाचे मूल्यांकन करणे, निदान आणि प्रक्रिया समजावून सांगणे, उपचार करणाऱ्या चमूशी  संवाद साधणे, पुढील प्रक्रियेसाठी रुग्णांना तयार करणे, रुग्णांना उपचारासाठी आर्थिक स्रोत शोधणे , रुग्णांना तपासणीसाठीच्या   भेटींची आठवण करून देणे, मानसिक  पाठबळ  प्रदान करणे, रुग्ण आणि कुटुंबियांचे  समुपदेशन करणे, उपचाराच्या विविध टप्प्यावर  मदत करणे, पुनर्वसन सहाय्य, याचा  मार्गदर्शकांच्या भूमिकेमध्ये समावेश आहे.केवट  (मार्गदर्शक ) केंद्रीकृत अहवाल प्रणालीचे अनुसरण करतात आणि नियमित अंतराने सहकारी , कर्मचारी आणि पर्यवेक्षकांद्वारे केलेले निरीक्षण, लेखापरीक्षण  आणि मूल्यांकन प्राप्त करतात.त्यांना वैद्यकीय  मार्गदर्शक आणि त्यातील तज्ज्ञ  दिले जातात जे त्यांच्या प्रगतीचा आराखडा तयार करतात आणि त्यांच्या उपक्रमांचा  आढावा घेतात.विशिष्ट प्रकरणांवर  आणि रुग्णाशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी ते ठराविक काळाने वैद्यकीय चमूची  आणि प्रशासकीय चमूची भेट घेतात. ते रुग्णांच्या अभिप्रायाच्या  एक बळकट  प्रणालीची  स्वतःजवळ नोंद ठेवतात , त्यांच्या  आधारावर ते प्रणालींमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि बदलांसाठी सूचना देतात. वेळेवर निदान आणि उपचार आणि वैद्यकीय उपचारासाठी प्रतीक्षा अवधी कमी करणे यावर ते लक्ष केंद्रित करतात.

इंडोनेशियाच्या  आरोग्य सेवा प्रदात्यांसह या सहकार्याच्या माध्यमातून ,सीपीएनची भूमिका स्पष्ट  करण्यासाठी आणि रूग्णालय सेवा प्रणालीमध्ये अंतर्भूत  रुग्ण मार्गदर्शन , स्थानिक अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी तांत्रिक सहाय्याद्वारे ज्ञानाचे हस्तांतरण आणि सीपीएनसाठी राष्ट्रीय मान्यता असलेल्या स्थानिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. सीपीएमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि ते जिथे आहेत त्या रुग्णालय उपचार यंत्रणेमध्ये  रुग्ण मार्गदर्शक  भूमिका लागू करण्यासाठी सहभागी व्यावसायिक प्रशिक्षण प्राप्त करतील.मिश्र शिक्षण पद्धती वापरून,सहभागींना 2 महिने आभासी माध्यमातून प्रशिक्षण आणि 3 महिन्यांसाठी  मुंबई इथल्या टीएमसी  टाटा मेमोरियल  केंद्रात थेट प्रशिक्षण, इंडोनेशियामध्ये 2 महिन्यांसाठी तज्ञांना भेटीचे  प्रशिक्षण मिळेल आणि टीएमसीच्या दृढ  सहाय्याने प्रत्येक रुग्णालयामध्ये 6 महिने नोकरीचे प्रशिक्षण मिळेल.  स्थानिक अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी तांत्रिक सहाय्याद्वारे ज्ञानाचे हस्तांतरण आणि राष्ट्रीय मान्यता असलेल्या सीपीएनसाठी स्थानिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचे उद्दिष्ट देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web