ऑक्टोबर २०२२ मधे एकत्रित जीएसटी महसूल संकलन १,५१,७१८ कोटी रुपये

नेशन न्युज मराठी टिम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – ऑक्टोबर 2022 मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,51,718 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 26,039 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 33,396 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,778 कोटी  (माल आयातीवर संकलित केलेल्या रु. 37,297 कोटींसह) आणि उपकर 10,505 कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित  केलेल्या रु. 825 कोटींसह) यांचा समावेश आहे. आत्तापर्यंतचा दुसरा उच्चांक आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला  37,626 कोटी रुपये  आणि  सीजीएसटीला  32,883 कोटी रुपये चुकते केले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्यांमधे 50:50 च्या प्रमाणात, त्या आधारावर 22,000 कोटी रुपये देखील चुकते केले आहेत.

नियमित समझोत्यानंतर  ऑक्‍टोबर 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी  74,665 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 77,279 कोटी रुपये आहे.

ऑक्टोबर 2022 चा महसूल हा एप्रिल 2022 मधील संकलनानंतरचे दुसरे उच्चांकी मासिक संकलन आहे. जीएसटीने  दुसर्‍यांदा मासिक 1.50 लाख कोटी संकलनाचा टप्पा पार केला आहे.  ऑक्टोबर 2022 नंतर, देशांतर्गत व्यवहारांमधून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन देखील पाहिले गेले. हा नववा महिना असून  सलग आठ महिने, मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.  सप्टेंबर 2022 मध्ये, 8.3 कोटी ई-वे बिले तयार झाली. ऑगस्ट 2022 मध्ये तयार झालेल्या 7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा ती अधिक होती.

खालील तक्त्यात चालू वर्षातील मासिक एकत्रित जीएसटी महसुलातील कल दर्शवला आहे. ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलाची  राज्यनिहाय आकडेवारी खालील तक्त्यांमध्ये दिली आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये जीएसटी महसुलाची राज्यवार वाढ

StateOct-21Oct-22Growth
Jammu and Kashmir648425-34%
Himachal Pradesh68978414%
Punjab1,5951,76010%
Chandigarh15820328%
Uttarakhand1,2591,61328%
Haryana5,6067,66237%
Delhi4,0454,67015%
Rajasthan3,4233,76110%
Uttar Pradesh6,7757,83916%
Bihar1,3511,344-1%
Sikkim2572653%
Arunachal Pradesh476539%
Nagaland384313%
Manipur6450-23%
Mizoram3224-23%
Tripura677614%
Meghalaya14016417%
Assam1,4251,244-13%
West Bengal4,2595,36726%
Jharkhand2,3702,5005%
Odisha3,5933,7695%
Chhattisgarh2,3922,328-3%
Madhya Pradesh2,6662,92010%
Gujarat8,4979,46911%
Daman and Diu0020%
Dadra and Nagar Haveli2692794%
Maharashtra19,35523,03719%
Karnataka8,25910,99633%
Goa31742032%
Lakshadweep2214%
Kerala1,9322,48529%
Tamil Nadu7,6429,54025%
Puducherry15220434%
Andaman and Nicobar Islands2623-10%
Telangana3,8544,28411%
Andhra Pradesh2,8793,57924%
Ladakh193374%
Other Territory13722766%
Center Jurisdiction189140-26%
Grand Total96,4301,13,59618%
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web