नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलामध्ये मध्ये कॉन्स्टेबल म्हणजेच हवालदार आणि एएसआय म्हणजेच सहाय्यक उप निरीक्षकांच्या 9500 पदांच्या भर्तीबाबत समाज माध्यमांवर आणि वर्तमानपत्रांमध्ये एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे. याद्वारे सूचित केले जाते की आरपीएफ किंवा रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कोणत्याही छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.
ही बातमी खोटी आहे आणि सर्व प्रतिष्ठित आणि जबाबदार माध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष करावे , असे याद्वारे पुन्हा सांगितले जात आहे