आयआयआयटी नागपूरचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नागपूर/प्रतिनिधी – आयआयआयटी-नागपूर -म्हणजेच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूरचा दूसरा दीक्षांत समारंभ आज संस्थेच्या परिसरात संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांसह, त्यांचे पालक, आणि देशभरातील या क्षेत्राशी संबंधित लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी, ट्रिपल आयटीएन मधून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना 146 पदवी प्रदान करण्यात आल्या. यात, चार पीएचडी पदव्या, 142 स्नातकपूर्व पदव्या देण्यात आल्या. त्याशिवाय, आयूषी टंडन  या ईसीई शाखेच्या विद्यार्थिनीला (सीजीपीए 9.37) तसेच, अरुण दास या सीएसई (सीजीपीए : 9.36) शाखेच्या विद्यार्थ्याला विशेष प्रावीण्य पुरस्कार देण्यात आला. त्याशिवाय, 70 पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्रेही  प्रदान करण्यात आली.

दीक्षांत समारंभाची सुरुवात एका भव्य शैक्षणिक मिरवणुकीने झाली, त्यानंतर प्रास्ताविक आणि त्यानंतर संस्थेचे संचालक डॉ. ओ.जी. काकडे यांनी संस्थेच्या अहवालाचे सादरीकरण केले.  यावेळी संचालकांनी 2016 मध्ये संस्थेच्या स्थापनेपासून सहा वर्षात साध्य केलेल्या उपलब्धी आणि विकासाची माहिती दिली.

पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे, या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. होते. कुलसचिव कैलास दाखले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (IIITN) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या 20 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांपैकी एक आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) कायदा, 2017 च्या तरतुदींनुसार IIITN ला “राष्ट्रीय स्तरावरील  महत्त्वाची संस्था” म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या संस्थेच्या कार्यान्वयनाची सुरुवात 2016-17 या वर्षापासून झाली.  शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत बुटीबोरी नागपुरातील तिच्या कायमस्वरूपी संकुलात  स्थलांतरित झाली. या संस्थेला, महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण  विभागाचे पाठबळ आहे, तसेच, उद्योग भागीदार म्हणून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचेही पाठबळ आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web