नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / संघर्ष गांगुर्डे – एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वाने लक्ष दिल पाहिजे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे,सांभाळायाला हवी असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी माजी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.गुरुवारी सकाळपासूनच सेनेतील दोन गटात शाखा ताब्यात घेण्यावरून वाद सुरु होते. यावर डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील याना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर पाटील यांनी उत्तर दिले आहे.
गुरुवारची सकाळचं डोंबिवलीत शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याचे शिंदे गटाचं प्रयत्न यशस्वी झालं आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करून शिंदे गटाने आपल्या ताब्यात शाखा घेतली आहे. या नंतर काही वेळ शाखेच्या बाहेर तणावाचे वातावरण देखील होते. मात्र यानंतर पोलिसांच्याबंदोबस्तानांतर शांतता डोंबिवलीत शांततेचं वातावरण निर्माण झाले आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील असं म्हणाले कि, तो त्या दोन गटांचा विषय आहे. शाखा कोणाच्या ताब्यात असायला पाहिजे, नसायला पाहिजे तो त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. मला वाटतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे, संभाळायला पाहिजे त्यांन. एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वाने देखील लक्ष दिले पाहिजे. कार्यकर्ता म्हणून ही भावना मांडतोय मी बाकी माझा तसा त्या काही गोष्टीशी संबंध नाही जे चाललंय ते त्यांच्या त्यांना लखलाभो. अश्या शब्दानं मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
राज्यात सुरु असलेल्या नोटांवरील फोटोंचा राजकारण शिगेला गेला आहे. या राजकारणाची सुरुवात हि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून झाली आहे. त्यावर मनसे आमदार राजू पाटील म्हणाले कि,पहिली गोष्ट म्हणजे केजरीवालांनी याची मागणी केली त्याच आश्चर्य वाटलं जो माणूस एवढे चांगलं काम करतो. त्याला चांगला बोलायला काही हरकत नाही, शाळांचा चांगला कायापालट त्यांनी दिल्लीत केला आहे. ते पण असे भावनिक राजकारण करायला लागले याचं वाईट वाटतं.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात राज्यात इंधनाच्या किंमती ज्या वाढल्या आहेत. त्याचा एकत्रित परिणाम सर्व गोष्टींवर होतो सर्व गोष्टी महाग होत चालल्यात बळीराजावर पावसाची अवकृपा झाली आहे. शेतकरी सुखी नाहीये, आपल्याकडे रस्ते चांगले नाही आरोग्यवस्था चांगले नाही आणि अशा वेळेस आपण कशावर भांडतो आणि राजकारण करतो तर नोटांवर फोटो कोणता पाहिजे लोक त्रासले आहेत, लोक बोलतात त्यांच्या भावना काय समोर येतात त्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे एवढं असंवेदनशील होऊन असं राजकारण आपण करतो. या टाईपचा राजकारण नाही करायला पाहिजे कुठेतरी वाईट वाटलं म्हणून ते ट्विट केला आहे. असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.