सांगली/प्रतिनिधी – आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेला बांधकाम कामगार कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात अनेक योजने पासून वंचित असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे लोकशाही मार्गाने आज बांधकाम कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर जनआक्रोश मोर्चा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन यांच्यातर्फे काढण्यात येणार होता. पण कोल्हापूरहून येत असताना सांगली पोलीस यांनी वंचित बहुजन माथाडी युनियन यांच्या अंकली फुलाजवळ सर्व गाड्या अडवल्या. त्यानंतर संजय प्रभाकर गुदगे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांनी आणि त्यांचे वरिष्ठ त्यांच्यासोबत पोलीस आणि यांच्यात समझोता करून हा मोर्चा सांगली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे भव्य जन आक्रोश मोर्चा झाला.
त्यामध्ये बोलत असताना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत वाघमारे यांनी सांगितले की आठ दिवसाच्या आत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस, मेडिकल योजना आणि बांधकाम कामगार यांना घरकुल योजना सुरू करावी या मागण्या मान्य न झाल्यास पुढच्या वेळेस आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार प्रशासन कामगार मंत्री आणि महाराष्ट्र शासन राहील असा इशारा प्रशांत वाघमारे यांनी दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत वाघमारे,कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष फरजाना नदाफ, कोल्हापूर जिल्हा संघटक लक्ष्मण सावरे,कोल्हापूर जिल्हा सल्लागार संभाजी कागलकर,सांगली जिल्हा नेते संजय कांबळे,कोल्हापूर जिल्हा महासचिव समाधान बनसोडे,कोल्हापूर शहर अध्यक्ष भारत कोकाटे,कोल्हापूर शहर संपर्कप्रमुख गणेश कुचेकर, हातकणंगले तालुका महिला अध्यक्ष सलमा मेमन, हातकणंगले तालुका महिला उपाध्यक्ष सुहासिनी माने,कोल्हापूर शहर उपाध्यक्ष सविता सोनटक्के,पन्हाळा तालुका अध्यक्ष नजमा मोकाशी,कोल्हापूर शहर सचिव कल्पना शेंडगे कोल्हापूर शहर संघटक किशोर सोनटक्के आणि मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष कामगार उपस्थित होते.