डोंबिवलीत ए.एस.जी.आय हॉस्पिटलतर्फे स्वच्छता मोहीम, नागरीकांनाही केले स्वच्छतेसाठी आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – दिवाळी सणात आपले घर स्वच्छ केले जाते त्याचप्रमाणे आपले शहरही स्वच्छ राहिले पाहिजे या उद्देशाने ए .एस.जी.आय हॉस्पिटलने माध्यमातून दिवाळी सणाचे औचित्य साधून “स्वच्छ घर भी, स्वच्छ शहर भी” या संकल्पनेनुसार हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, अधिकारी, कर्मचारी यांनी डोंबिवली शहरात स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेला प्रशासनाचे सहकार्य मिळाले.विशेष म्हणजे या मोहिमेत पोलिसांनी सहभाग घेतला होता.

गुरुवारी सकाळी पूर्वेकडील मानपाडा रोडवरील त्यांच्या हॉस्पिटलपासूम या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. गावदेवी मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, केळकर रोड, शिवमंदिर रोड मार्गे पुन्हा हॉस्पिटल असा सुमारे 8 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि सरकारी कार्यालय परिसर स्वच्छ करीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांसमवेत जंतुनाशक फवारणी करण्यात आली. रस्त्याच्या बाजूला जेथे गरज आहे तिथे डी.डी.टी. पावडर टाकण्यात आली.

डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावर, रामनगर पोलीस ठाण्याच्या परीसरातील पालापाचोळा, केळकर रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ मठ पदपथ आणि शिवमंदिर चौक पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.

यावेळी हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर हरीश पाठक म्हणाले, देशभरातील आमच्या एस.जी.आय हॉस्पिटलच्या 45 शाखा आहेत. सगळ्या शाखांच्या माध्यमातून 20 सप्टेंबरला सकाळी 5 ते 8 या वेळेत स्वच्छता अभियान आम्ही राबवत आहोत. या कृतीतून आम्हाला सर्वांना संदेश द्यायचा आहे की, जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं शहरी स्वच्छ ठेवण्यात सर्वांनी हातभार लावावा. आमच्या या मोहिमेला पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन यांनी सहकार्य केले आहे याचे समाधान वाटत आहे. या स्वच्छता मोहिमेसाठी डॉ. हरीश पाठक, डॉ. विनायक दामगुडे, सेंटर मॅनेजर- दीपक मौर्य, जीवन गौड, मार्केटिंग मॅनेजर राजाराम तुकाराम नलवडे यांनी विशेष मेहनत घेतली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web