स्मार्ट सिटीची मैदाने स्मार्ट कधी होणार ? कल्याणचे वैभव असलेल्या सुभाष मैदानाची दुरवस्था

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका असख्य प्रश्नांनी वेढलेली महानगर पालिका असे चित्र दिवसदिवस बनत चाललेले आपल्याला पाहायला मिळते. खराब रस्ते ,वाहतूक संमस्या,पाण्याचे प्रश्न, अनधिकृत बांधकामे अशा कोणत्याना कोणत्या कारणाने महापलिका नेहमीच चर्चेत असते. मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री यांनीही रस्त्यावरून प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांना सुद्धा धक्का बसला होता कि कल्याण डोंबिवली हे स्मार्ट सिटी आहे म्हणून. मंत्री अनुराग ठाकूर हे केंद्रीय क्रीडा मंत्री देखील आहेत शहराचे नशिब त्यांनी इथल्या मैदानांची पाहणी केली नाही नाहीतर त्यांना आणखीन एक मोठा धक्का बसल्या शिवाय राहिला नसता.

केडीएमसी मुख्यालयाच्या लगद असलेल्या कल्याणचे वैभव असलेल्या सुभाष मैदानाची दयनीय अवस्था बघून क्रीडाप्रेमी नागरीकांमध्ये कमालीची नाराजी आहे. कल्याण मधील सर्व मैदानात सर्वात जूने अस मैदान असेल तर ते सुभाष मैदान. या मैदानात अनेक सभा गाजल्या आहेत. त्याच प्रमाणे या मैदानात नावाजलेल्या खेळाडूंनी येथेच प्रशिक्षण घेऊन सराव केला आहे. जर अशीच दुरवस्था या मैदानाची राहिली तर नवीन खेळाडूं कसे तयार होणार आणि त्या खेळाडूंकडून आपण काय अपेक्षा बाळगणार.असा सवाल नागरिकाचा आहे.

सुभाष मैदानात लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरीकांपर्येंत सर्वच नागरिक येतात काही मोर्निंग वॅाकसाठी, काही खेळाचा सराव करण्यासाठी तर काही तरुण पोलिस भरतीला लागणाऱ्या सरावासाठी येतात.त्यात तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात येतात.पण या नावाजलेल्या मैदानात साधी स्वच्छातागृहाची सोय नसल्याने तरुणी महिला वर्गाची मोठी गैरसोय होताना दिसुन येत आहे. यामुळे येथे येणाऱ्या महिला वर्गाने कमालीची नाराजी वक्त केली आहे. मैदानाला लागून असलेल्या उद्यानात असलेल्या स्वच्छातागृहाचीही अवस्था देखील दयनीय आहे. स्वच्छातागृहाचीही सोय नसल्यामुळे येथे तुरुणी इच्छा असतानाही येथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत नसल्याचे येथील क्रिकेट प्रशिक्षकांनी सांगितले आहे. म्हणजेच जर महिला जागतिक क्रिकेट मध्ये आपल्या देशाचे नाव गाजवत जरी असल्या तरी कल्याणच्या मैदानात स्वच्छातागृह नसल्यामुळे तरुणींना क्रिकेटचे प्रशिक्षण घेता येत नाही ही फार खेदाची बाब आहे.

त्याच बरोबर इतर शहरातील मैदानातील पावसाळ्या नंतरचे गवत काढून खेळ सरावाला सुरवात झाली आहे पण सुभाष मैदानात गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खेलाडूंना सरावही करता येत नाही असेही त्यांनी सांगितले.

या मैदानातील बैठक गॅलेरी अवस्था भयंकर आहे येथे मोठे कचर्याचे साम्राज्य पसरलेले आपल्याला पाहायला मिळेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास संपूर्ण मैदानाची दुरवस्था झाल्याची आपणास पहावयाला मिळते . यामुळे क्रीडाप्रेमी नागरिकांच्या मनात कमालीची नाराजी आहे पालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालून सुभाष मैदानाची झालेली दुरवस्था लवकरात लवकर दूर करावी अशी विनंती सर्व नागरीकांनीनी महानगरपालिकेला केली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web