नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – संतोष इन्स्टिटय़ूट फॉर मेंटली चॅलेंज चिर्डनच्या वतीने अनेक वर्षांपासून डोंबिवली पूर्वेला राजाजी पथ मधील आदर्श विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्वमग्न मुलांना शिक्षण दिले जाते.दिवाळीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक पणजी, दिवे, कंदील आदी वस्तू बनविल्या.या वस्तूचे शाळेत प्रदर्शन भरवले होते.शिक्षकांच्या मदतीने स्वमग्न मुलांनी बनविलेल्या वस्तू पाहण्यासाठी पालक वर्ग व नागरिक आले होते.
संस्थापक दत्ता फोंडे, मुख्याध्यापिका कांचन पवार यांसह संतोष बांगणे त्याच बरोबर अनेक शिक्षक महिनाभर स्वमग्न विद्यार्थ्यांना कंदील, पणत्या, दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देत होते. आकर्षक अश्या वस्तू पाहताना विकत घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रत्येक सणाला हे विद्यार्थी विविध वस्तू बनवीत असून यातून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळत असल्याचे संस्थापक फोंडे यांनी सांगितले.