नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – ” एक भारत श्रेष्ठ भारत” अंतर्गत महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सचा रोउरकेला,ओडिसा येथे दहा दिवसाचा कॅम्प झाला. कॅम्प मध्ये एनसीसी कॅंडिडेट्स , महाराष्ट्रातून ओडिशामध्ये जाऊन या कॅंडिडेट्स ना संस्कृतीची देवाणघेवाण करणे, क्रीडा, खेळ, संस्कृती ,संस्कार, ही देशाची संपत्ती जपण्यासाठी, EBSE कॅम्प यामध्ये दहा दिवसात विविध स्पर्धा झाल्या.
नॅशनल लेव्हलला खेळताना महाराष्ट्राच्या टीमने हॉलीबॉल या खेळामध्ये ओडीसाच्या संघाला हरवून सुवर्णपदक मिळवले, पुणे, मुंबई ,नागपूर, मधील एनसीसी मुलींचा हॉलीबॉल महाराष्ट्राच्या टीम मध्ये समावेश होता. त्यामध्ये कल्याण मधील बिर्ला कॉलेजच्या , एसएससी थर्ड इयर ची प्राजक्ता ताजणे,आणि सेकंड ईयरची उन्नती शरद शिंदे यांचा समावेश होता, त्यामुळे पुन्हा एकदा बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मानाचा तुरा रोवला.