कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, या आदेशाचे परीपत्रक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले आहे.
अशा प्रकारच्या देणग्या (भेट वस्तू) महानगरपालिकेच्या अधिकारी / कर्मचारी यांनी स्विकारल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्या येईल याची सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्पष्ट नोंद घ्यावी. असा आदेश या परिपत्रकाद्वारे दिला आहे.
तसेच हे परिपत्रक महापालिकेच्या मुख्यालयासह विविध कार्यालयांमध्येही लावण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे केडीएमसीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी गिफ्ट केडीएमसी कार्यालयांबाहेरच स्वीकारावी लागणार आहे.