विविध मागण्यांसाठी वंचितचे हल्लाबोल आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

उमरखेड/प्रतिनिधी – जिल्ह्यातील अपंग विधवा परितक्त्यांना वेळेत मानधन मिळत नाही. विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळत नाही. पांदन – शिव रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. आरोग्य यंत्रणा मस्तावलेली आहे. शासकीय दवाखान्यांमध्ये कुठल्याच सोयी सुविधा नाहीत. साधारण आजाराला जिल्ह्यावर रेफर करतात.भूमीहीन लोकं उदरनिर्वाहासाठी सरकारी जमीन कसून खातात. त्यांच्याकडे पोट भरण्याची कुठल्याही प्रकारचे साधन नाही. ते कसत असलेले सरकारी पट्टे त्यांच्या नावाने करून देण्यात यावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत दाखल असलेले प्रकरणे तात्काळ निकाली काढा. घरकुल बांधकामासाठी वेळेवर रेती मिळत नाही आवाचा सव्वा दरात रेती घ्यावी लागते. त्यासाठी नफा ना तोटा दरात त्यांना रेती पुरवठा करण्यात यावा.या सह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील 1 ते 2 रेती घाट आरक्षित करून रेती पुरवठा करण्यात यावा, गाव तिथे स्मशानभूमी योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व गावांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. व दहनशेड बांधकाम करून देण्यात यावे.रस्त्यांच्या समस्या गंभीर आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंतर्गत खराब झालेले रस्ते दुरुस्त करावे, व नव्याने डांबरीकरण करून नवीन रस्ते तयार करण्यात यावे. कठडे नसलेल्या पुलांना तात्काळ कठडे बसविण्यात यावे जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल.

राष्ट्रीयकृत बँकेत प्रलंबित असलेले कर्ज प्रकरणे निकाली काढावे.दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्ती विकास कामाचा निधी इतरत्र वळविला जातो. तसे कृत्य करणाऱ्या वर कठोर कारवाई करावी.या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी उमरखेड च्या वतीने ऊपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे आंदोलन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या सूचनेनुसार जॉन्टी उर्फ प्रशांत विनकरे (जिल्हा महासचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे, सभापती संबोधी गायकवाड देवानंद पाईकराव,यांच्या नेतृत्वात ,उपविभागीय अधिकारी उमरखेड येथे “हल्लाबोल आंदोलन” करण्यात आले. यावेळी डिके दामोधर, सतीश खाडे, बुद्धरत्न भालेराव तालुकाध्यक्ष पुसद जय आनंद उबाळे शहराध्यक्ष पुसद, प्रसाद खंदारे पुसद, प्रल्हाद नवसागरे तालुकाध्यक्ष महागाव, देवराव खंदारे तालुका महासचिव महागाव, देवानंद पाईकराव (तालुकाध्यक्ष हदगाव), कोब्रा दवणे (तालुका उपाध्यक्ष हदगाव), सुशील भालेराव, मौलाना सय्यद हुसेन, जिल्हा संघटक, मौलाना शेख मदार शेख चांद, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,विष्णुकांत वाडेकर ता. सहसचिव उमरखेड, भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास कदम, श्याम धुळे भीम टायगर सेना, सिद्धार्थ दिवेकर (निस्वार्थी निर्भीड पत्रकार उमरखेड) प्रफुल दिवेकर (डॉशिंगयुवा नेतृत्व उमरखेड) सिद्धार्थ धोंगडे ज्येष्ठ नेते, बाबुराव नवसागरे ज्येष्ठ नेते, संभाजी मुनेश्वर सर शहराध्यक्ष उमरखेड अर्जुन बरडे ज्येष्ठ नेते, भीमराव हापसे यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web