नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भारतीय रेल्वेचे एकूण अंदाजे उत्पन्न 33476 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 17394 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत ही वाढ 92 टक्के इतकी आहे.
आरक्षित प्रवासी श्रेणीत 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आरक्षित प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 42.89 कोटी आहे जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतल्या 34.56 कोटीच्या तुलनेत 24% अधिक आहे. 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आरक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त महसूल 26961 कोटी रुपये आहे. मागील वर्षी याच कालावधीत प्राप्त 16307 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत ही वाढ 65% आहे.
अनारक्षित प्रवासी श्रेणीत 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आरक्षित प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 268.56 कोटी आहे जी मागील वर्षी याच कालावधीत 90.57 कोटी होती, यात 197% ची वाढ दिसून येते. 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अनारक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त महसूल 6515 कोटी रुपये आहे, ज्यात मागील वर्षीच्या याच कालावधीतील 1086 कोटी रुपयांच्या तुलनेत 500% वाढ झाली आहे.