डोंबिवलीत वर्षावास समापन सोहळा,भव्य धम्म रॅली

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – आज समाजामध्ये डॉ बाबासाहेबांची जयंती अनेक मंडळात, विभाग आणि गटांमध्ये साजरी होते. समाज गटातटात विखुरला गेलेला आहे . समाजाला एकत्र करायचे असेल तर बौद्ध धम्मा शिवाय दुसरा पर्याय नाही. असे प्रतिपादन भन्ते राहुल बोधी यांनी डोंबिवली येथील वर्षावास सांगता सोहळा कार्यक्रमावेळी केले.

डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर येथे धर्मवीर आनंद दिघे सभागृहात वर्षावास सांगता समारंभाचे आयोजन बौद्ध समाज डोंबिवलीच्या वतीने करण्यात आले होते. त्या निमित्त कठीण चिवरदान सोहळा व भव्य धम्म रॅलीचा सोहळा पार पडला.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुमारे चाळीस भन्तेना उपासकांच्यावतीने चिवरदान करण्यात आले. याच कार्यक्रमात पुढे बोलताना भन्ते राहुल बोधी यांनी सांगितले की, वर्षावास ही बौद्ध धर्मात सुमारे अडीज हजार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. भारतात नव्हे तर जगात सुद्धा या परंपरेचे पालन होत आहे. वर्षावास ही संस्कृती आपल्या समाजात रुजली पाहिजे. आजच्या तरुण पिढीवर बुद्ध धम्म्माच्या विचाराचा प्रभाव पडल्यास भावी पिढी सुसंस्कृत होईल. बौद्ध समाजचा आर्थिक, सामाजिक विकास होऊन एक आदर्श समाज म्हणून जगासमोर यावा, यासाठी वर्षावासाचे नियोजन करण्यात आल्याचे भन्ते राहुल बोधी थेरो यांनी सांगितले.तर भन्ते डॉ. आनंद महाथेरो यांनी आपल्या देशात बुध्दांनी दिलेला शांततेचा संदेश प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजवला गेला तर जगात शांती नांदण्यास मदत होईल, असे प्रतिपाद केले. हा बुद्धांचा देश आहे. जगाला बुद्ध हवा युद्ध नको, असे सांगत सर्व बौद्ध समाजाने एक व्हावे असा संदेश उपासकांना दिला.

डोंबिवली शहरात गेल्या तीन महिन्यापासून वेगवेगळया विभागात वर्षावास वर्ग घेण्यात आले. त्या सर्वांनी मिळून सांगता समारंभाचे सामूहिक आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे संयोजन भन्ते राहुल बोधी थेरो यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक भन्ते डॉ.एन. आनंद महाथेरो उपस्थित होते. प्रा.रविकिरण मस्के, प्रा. धनंजय पगारे, आंबादास खंडागळे, रवि गुरचळ या नियोजन समिती सदस्यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन केले. सम्राट अशोक बुद्ध विहार-संजयनगर, देसले पाडा भोपर बौद्ध समाज मंडळ, धम्मदीप विहार-लोढा हेरीटेज, सम्यक धम्म सामाजिक संस्था -गांधीनगर, बौद्ध सेवा संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र-एमआयडीसी, यशोधरा महिला संघ-गणेशनगर, भीमगर्जना महिला मंडळ-त्रिमुर्तीनगर, लुंबिनी विहार-कोपर इ. ठिकाणी वर्षावास धम्मदेसना घेण्यात आल्या.

धम्म रॅलीचे स्वागत आणि सभागृह व्यवस्था सम्यक धम्म सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डी.डी.जाधव, कार्यकारी मंडळ व महिला मंडळ यांनी पार पडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्थेने स्मारकाचे सुशोभिकरण व रॅलीचे नियोजन केले. भारती फौंडेशनतर्फे पाणी वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , सुरेंद्र ठोके, निलेश कांबळे कल्पना चौधरी, कुसुम खंडागळे, महेंद्र जाधव, सुहास रोकडे, संजय गौतम, विजय इंगोले, रवी इंगोले, गुलाब खंदारे, आशिष कांबळे, श्रीकांत माने, विलास खंडिझोड, राष्ट्रपल ढोबळे, बाजीराव माने, अर्जुन केदार इ. विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने डोबिवलीतील बौद्ध समाज उपस्थित होता.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web