नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने भारत देशातील बो बौद्ध धर्मीय व आंबेडकरी अनुयायां मध्ये संतापाची लाट पसरली असून कल्याणातील रिपब्लिकन सेनेच्या वक्त रामदास आठवले यांच्या चूकींच्या वक्तव्याचा विरोधात त्याच्यावर कायदेशिर कारवाई साठी कल्याण तहसीलदार कार्यालयावर निषेध आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन दिले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आर एस एस व बिजेपीच्या दावणीला बांधलेला आमच्या समाजातील चातुगिरि करणारा नेता आऊन त्यांनी भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने तमाम भारतातील बौद्ध धर्मीय व आंबेडकरी अनुयायी यांच्या भावना दुखावल्या असल्याने समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष व संताप निर्माण झाला आहे.
त्या अनुषंघाने रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने कल्याण शहर रिपब्लिकन सेनेच्या वतीने कल्याण शहर अध्यक्ष दामू काउतकर,कल्याण जिल्हा नेते विक्रम खरे ,शहर सचिव लक्ष्मण खंदारे,विलास मोरे ,दीपक गायकवाड,नामदेव गायकवाड, यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी कल्याण शहरात निषेध करीत कल्याण तहसीलदार यांना रामदास आठवले यांच्या चूकींच्या वक्तव्याचा विरोधात कायदेशिर कारवाईची मागणी करीत निवेदन दिले.