नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी– शिवसेनेच्या उद्भव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिलय त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले याची घोषणा होतात कल्याण मधील शिवसैनिकांनी एकच जल्लोष करीत मशाली नाचवत आनंद व्यक्त केला .
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी हातात पेटत्या मशाली घेऊन जणू आनंद उत्सव साजरा केला यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली तर गद्दारांनी शिवसेना फोडून जो काही अंधकार या राज्यात पसरवला आहे तो अंधकार दूर करण्यासाठी आमच्या पक्षाला ही धगधगती मशाल हे चिन्ह मिळाले प्रकारची तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. मशाली हातात घेऊन शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला व मशाली नाचवत आनंद व्यक्त केला.