नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – सरकारने शस्त्रास्त्र निर्मिती (वेपन सिस्टम,WS) शाखा नावाची नवीन शाखा तयार करण्यास मान्यता दिली असून भारतीय हवाई दलाने (IAF) उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या डब्ल्यूएस शाखेच्या निर्मितीमुळे जमिनीवरून मारा करणाऱ्या आणि विशेष हवाई शस्त्रास्त्रांच्या (वेपन सिस्टम) सर्व समर्पित परीचालनाचे एकत्रीकरण होऊन सर्व शस्त्र प्रणालींचे परीचालन एकाच छत्राखाली होईल.
या शाखेत पृष्ठभागावरून-ते-पृष्ठभागापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे,पृष्ठभागावरून-हवेत मारा करणारी- क्षेपणास्त्रे, दूरस्थपणे (रीमोटने) चालवली जाणारी एअरक्राफ्ट आणि जुळ्या/मल्टी-क्रू विमानांमधील शस्त्र प्रणाली अशा परीचालनाच्या चार विशेष शाखांमधील परीचालकांचा समावेश असेल. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेत वाढ होण्यासाठी ही शाखा खूप मोठे योगदान देईल.