एआयसीटीएस डॉक्टरांनी केली नवजात बालकावर पी डी ए स्टेन्टींग हायब्रीड यशस्वी शस्त्रक्रिया

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

पुणे/प्रतिनिधी – पुण्यातल्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) संस्थेत हृदयविकार तज्ञ, छाती तज्ञ आणि हृदयशस्त्रक्रिया भूल तज्ञांच्या पथकाने जन्मजात हृदयविकार असलेल्या नवजात अर्भकावर पी डी ए स्टेन्टिंग ही  दुर्मिळ हायब्रीड शस्त्रक्रिया केली. अवघ्या 2.5 किलो वजनाच्या या नवजात बालकाचा जन्म फुफ्फुसाच्या झडपा बंद असलेल्या पल्मनरी अट्रेसिया या विकारासह झाला होता. छोट्या  नळीसारखी रचना असलेल्या आणि जन्मानंतर लगेचच फुफ्फुसाच्या धमन्याकडे होणाऱ्या रक्तप्रवाहाला पेटंट डक्टस आर्टेरिओससमुळे अवरोध निर्माण होतो. नवजात अर्भकांच्या  रक्तवाहिन्या अतिशय लहान असल्याने स्टेन्ट टाकणे हे नेहमीच एक आव्हान ठरते. मात्र, हृदयविकार तज्ञ शल्यविशारदांनी धमन्यांना विच्छेद देत स्टेन्ट टाकण्याची  प्रक्रिया सुकर केल्याने या नवजात अर्भकाला नवीन जीवन मिळालं असून बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

एआयसीटीएस हे लष्कराचं सुपर स्पेशालिटी अग्रणी  केंद्र असून जन्मजात गुंतागुंतीच्या हृदयविकार शस्त्रक्रियांचे यशस्वी  व्यवस्थापन करण्यात कायम आघाडीवर राहीले आहे. AICTS मधील लष्करी डॉक्टरांच्या अतिशय कार्यक्षम पथकाने सर्वसमावेशक सांघिक दृष्टीकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व प्रकारच्या  हृदयविकाराच्या  व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक विशेष दर्जेदार सेवा प्रदान करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. ते लष्कराचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, माजी कर्मचारी तसच महागडे उपचार घेऊ न शकणाऱ्या सामान्य  नागरिकांनाही सर्वांगीण सेवा पुरवत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web