पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकनसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी नामांकने सादर करण्यासाठी आधी निश्चित केलेल्या 30 सप्टेंबर 2022 या विहित कालमर्यादेचा विस्तार करून आता 31 ऑक्टोबर 2022 रोजी 5 वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांसाठीचे नवे पोर्टल (https://awards.gov.in/) आता कार्यान्वित झाले आहे अशी माहिती सामान्य जनतेला कळविण्यात येत आहे.

इच्छुक उमेदवारांनी उपरोल्लेखित राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर नोंदणी करून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करावा. ज्यांनी या पुरस्कारासाठी https://nca-wcd.nic.in/ या जुन्या पोर्टलवर याआधीच नोंदणी केली आहे ते अर्जदार देखील नव्या पोर्टलवर नोंदणी करून नामांकने सादर करू शकतात

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web