नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि ओगावा सोसायटी, ड्रॅगन पॅलेस, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 ते 6 ऑक्टोबर 2022 दरम्यान ड्रॅगन पॅलेस परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाचा जिवन प्रवास’ हे मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन 4 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी मंत्री सुलेखा कुंभारे उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती सांगणारे सचित्र छायाचित्र, तसेच डिजीटल वॉल, एलएडी टीव्हीवर चलचित्र स्वरूपात माहिती असणारे विविध चित्रपट/माहिती पट ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर भारत सरकारच्या प्रकाशन विभागाद्वारे पुस्तकांचे विक्री प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, कामठी मार्फत नागरीकांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले आहे. सदर प्रदर्शन 4 ते 6 ऑक्टोबर, 2022 दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन नागरिकांसाठी नि:शुल्क आहे. सदर प्रदर्शनाला नागरीकांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनाचा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूर व ओगावा सोसायटी, कामठी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.