नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली /प्रतिनिधी – भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पुन्हा 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. सध्याची प्रतिकूल जागतिक परिस्थिती, देशांतर्गत आर्थिक व्यवहार, तसेच वाढती महागाई लक्षात घेत रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ केली आहे, त्यामुळे हा दर आता 5.40% इतका झाला आहे.या दर वाढीमुळे स्थायी ठेव सुविधा – एसडीएफ दर 5.65% आणि किरकोळ स्थायी सुविधा – एमएसएफ दर तसेच बँक दर 6.15% इतका झाला आहे. या वाढीचे समर्थन करताना, पतधोरण समितीने, वाढीला प्रोत्साहन देतानाच महागाई आटोक्यात राखण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.
रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यावसायिक बँकांना कर्ज देते तो दर, त्यात वाढ करण्यात आली आहे. प्रचलित प्रतिकूल जागतिक वातावरण, देशांतर्गत आर्थिक व्यवहारातील लवचिकता, सुखावह नसलेला चलनवाढीचा उच्च स्तर लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ने धोरणात्मक रेपो दरात वाढ केली आहे . त्यामुळे आता रेपो दरातील या वाढीचा बोजा बँक ग्राहकांवर पडणार आहे. यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता वाढेल. गृहकर्जासोबतच वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा हप्ताही वाढणार आहे. आदीच महागाईची जळ सोसत असलेल्या नागरिकांना रेपोदरात वाढ हा मोठा महागाईचा झटका आहे.आणि आता दिवाळी सण तोंडावर आहे त्यात आरबीआयने रेपो दारात वाढ करून सणासुदिच्या तोंडावर सामान्यांना मोठा झटका दिला आहे असे म्हणायला काही हरकत नाही.रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे
रेपो दरात वाढ झाल्यानं ईएमआय भरणाऱ्यांना पुन्हा एकदा झटका लागणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवल्यानंतर सर्वच बँकांनी आपले व्याजदर वाढवण्यास सुरूवात केली होती. होम लोनशिवाय ऑटो लोन आणि अन्य लोनही आता महाग होईल.आदीच महागाईचा मार सोसत असलेल्या जनतेला हा मोठा झटका म्हणावा लागेल.सर्वसामान्यांना उपलब्ध होणारे कर्ज आता महाग होणार आहे.
.