जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर/प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील उमरड व मांजरगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कुंभेज फाटा ते बाभूळगाव रस्त्यासाठी संपादित झाल्या असून त्यांना अद्यापही दोन गावातील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसून वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मोबदला दिला नाही तर तर 17 तारखेला सर्व शेतकरी सार्वजनिक बांधकाम कार्यालय करमाळा येथे अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

संबधित खात्यांना याबाबत सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री,ग्रामविकासमंत्री,जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी,प्रांताधिकारी,तहसिलदार करमाळा,पोलीस निरीक्षक करमाळा, सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा व संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web