मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने  चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग अंतर्गत मुंबई विद्यापीठ झोन 3 ची आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टींग स्पर्धा जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे सोमवारी पार पडली. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दैदिप्यमान यश प्राप्त केले. 
या स्पर्धेत श्रुती मोरे हिने मुलींच्या 64 किलो वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले. तर मुलांच्या स्पर्धेत अक्षय प्रजापती व शाहिद शेख यांनी सुवर्णपदक तर सागर बनबासी याने रौप्य व राममनोहर भगत याने कांस्य पदक पटकावले.

तसेच या स्पर्धेतून श्रुती मोरे, अक्षय प्रजापती, शाहिद शेख व सागर बनबासी या खेळाडूंची निवड खोपोली येथे होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी ठाणे झोन 3 च्या संघात झाली आहे.
 महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. नवनाथ गायकर यांनी अथक मेहनत करून विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कोमल चंदनशिवे व संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंची खोपोली येथे होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी ठाणे झोन 3 च्या संघात निवड झाल्याने डॉ. गिरीश लटके यांनी आनंद व्यक्त केला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web