नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जीएसआर 714 (ई ) दिनांक 20 सप्टेंबर 2022 द्वारे, अधिसूचित मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांसंबंधित (ADTC) नियम जी .एस. आर 394 दिनांक 07 जून 2021मध्ये सुधारणा जारी केली आहे.
या नियमांच्या अंमलबजावणीदरम्यान, या मंत्रालयाने तसेच इतर भागधारकांनी काही समस्या नोंदवल्या होत्या.
नवे नियम, पुढील प्रमुख वैशिष्ट्यांसह मान्यताप्राप्त ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्स (ADTC) चे कार्य अधिक सुव्यवस्थित करतील –
1. मान्यताप्राप्त ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्सच्या मान्यतेचे नूतनीकरण पाच (5) वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल.
2. दुचाकीचे प्रशिक्षण देण्याच्या अभ्यासक्रमात विशेषत्वाने प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक ज्ञानाचा तपशीलवार, सर्वसमावेशक अंतर्भाव आवश्यक आहे.
3. चालक परवाना जारी करण्यासाठी आवश्यक असलेले प्राविण्य चाचणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षणार्थीने “वाहन चालविण्याच्या क्षमतेची चाचणी” उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
4. मान्यताप्राप्त ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्स (ADTC) शी जोडलेल्या इतर तरतुदी जसे की, शुल्क, चालक परवाना जारी करणे इत्यादी बाबतचे नियम स्पष्ट केले आहेत.